Saturday, 23 July 2022

मुथा महाविद्यालयात ओबीसी कोण परिषद संपन्न ! *ओबीसी आरक्षणासाठी गठित केलेला भाटिया आयोगमध्ये त्रुटी असल्याने आम्हाला मान्य नाही - भानुदास माळी*

मुथा महाविद्यालयात ओबीसी कोण परिषद संपन्न !

*ओबीसी आरक्षणासाठी गठित केलेला भाटिया आयोगमध्ये त्रुटी असल्याने आम्हाला मान्य नाही - भानुदास माळी*


कल्याण, संदीप शेंडगे : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठीचा सगळा इंपिरीकल डेटा तयार केला होता. आम्ही तयार केलेला डेटा या सरकारने घाईघाईने कोर्टात सादर केला. ओबीसींना आरक्षण मिळण्याचे दरवाजे खुले झाले असले तरी दुर्दैवाने आघाडी सरकार आज राज्यात नाही. त्याचे श्रेय भाजपा सरकार घेत आहे. त्यामुळे आम्ही नाराज झालो आहोत. सध्या सुप्रिम कोर्टातर्फे मान्य करण्यात आलेल्या भाटीया आयोगाने दिलेल्या अहवालातल्या सर्व गोष्टी आम्हाला मान्य नाहीत त्यात अनेक त्रुटी आहेत असे परखड मत कांग्रेसचे प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी आज व्यक्त केले. 
सेठ हिराचंद मुथा महाविद्यालयातर्फे आयोजित व्हॉट इज ओबीसी या कार्यक्रमात आज ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.


सगळ्या जिल्हयात आरक्षण वेगवेगळे असून, त्यात दुरुस्ती पाहिजे त्या अहवालाची पुर्तता आता यापुढे कॉंग्रेस पक्ष करेल असेही यावेळी त्यांनी सांगितले. या अहवालामध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नसून काही जिल्ह्यांमध्ये दोन दोन तीन टक्के ओबीसींना आरक्षण मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या संख्येने नुसार आरक्षण मिळत आहे.
या प्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुथा, प्रभारी प्राचार्या वैशाली गोखले, ठाणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष जयदीप सानप निवृत्त पोलिस ऑफीसर रविंद्र तायडे आदि मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थातूनच लोकप्रतिनिधी तयार होतात आणि हेच पुढे देशाचे भावी नेतृत्व साकारतात. यासाठी ओबीसी आरक्षणाची गरज आहे. जनप्रतिनिधी नाही तर जनतेचे काम कसे होणार. समाजातील मागासवर्गीय कोणताही घटक सामाजिक आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित होता कामा नये यासाठी आरक्षण आवश्यक आहे असे मत मुथा महाविद्यालयाचे चेअरमन प्रकाश मुथा यांनी कार्यक्रमात व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...