कल्याण मध्ये आज अमित ठाकरे यांनी साधला विद्यार्थी व मनसे कार्यकर्त्यांसोबत संवाद !
कल्याण, बातमीदार : आज कल्याणमधे महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियान अंतर्गत अमित ठाकरे यांनी आज (23 जुलै) रोजी कल्याणमध्ये विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना त्यांनी सांगितले की, संघटनात्मक काही बदल देखील केले जातील. या दौऱ्यादरम्यान ठिकाणच्या विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतोय. त्यांच्या अडचणी जाणून घेतोय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य सोपं करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे. मात्र यावेळी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मनसेला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरु आहे. याबाबत अमित ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता, "मला राज ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल," असं सांगत मंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला.
या दौऱ्यात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अमित ठाकरे यांनी कल्याणमधील स्प्रिंग टाईम क्लबमध्ये विद्यार्थी, मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

No comments:
Post a Comment