आडी बौद्धजन आणि रोहिदास उन्नति मंडळ, आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !!
मुंबई - ( दिपक कारकर ) : आडी बौद्धजन आणि रोहिदास उन्नति मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन खोपकर, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. दीपक गमरे, श्री. राजेश गमरे मंडळाचे खजिनदार श्री. सुनील गमरे, मंडळाचे सल्लागार श्री. रवींद्र गमरे, मंडळाचे सभासद श्री. अविनाश खोपकर तसेच ग्रामपंचायत आडी, महाड खाडीचे सरपंच श्री. प्रकाश म्हसकर, उपसरपंच काशी बाई, ग्रामिण कमिटीचे अध्यक्ष श्री राजेंद्र भोगल साहेब, वरिष्ठ सल्लागार श्री. रामचंद्र तांबिटकर साहेब, प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री निमजे सर, त्यांचे सहकारी उपशिक्षक श्री गायकवाड सर, अंगणवाडी सेविका कदम बाई आणि उत्तीर्ण इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री रामचंद्र तांबिटकर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या फोटो समोर दिपप्रज्वलाने झाली, तसेच ग्रामीण अध्यक्ष यांनी सुगंधित अगरबत्ती लावून वातावरण सुगंधित केले, श्री. सरपंच साहेब आणि मुख्याध्यापक निमजे सर यांनी सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पहार घालून वंदन केले.
या कार्यक्रमात सूत्रसंचालन श्री संदीप गमरे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करताना ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी श्री. सचिन खोपकर यांची निवड केली, आणि त्यास सर्वांनी टाळ्या वाजून अनुमोदन दिले. संदीप गमरे यांनी उत्कृष्टपणे सूत्र संचालन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि प्रत्येक मान्यवरांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती केली, त्यामध्ये सरपंच साहेब, भोगल साहेब, तांबिटकर साहेब, मुख्याध्यापक निमजे सर यांनी उत्कृष्ट असे मारदर्शन करून सर्व उत्तीर्ण विध्यर्थी यांचे मनोबल उंचावले. तसेच आडी बौद्धजन आणि रोहिदास उन्नति मंडळाचे जेष्ठ सल्लागार श्री. रवींद्र पां. गमरे यांचे चिरंजीव कु. सुमन गमरे हे सध्या आय पी एस (I P S ) ची परीक्षा देत आहे, त्याने सुद्धा मुलांना चांगले मार्गदर्शन केले.
सर्वांचे मनोगत संपल्यानंतर सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले, त्यावेळी मुलांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी यांना मंडळातर्फे शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात, कार्यक्रमाला सर्व उपस्थित मान्यवरांचे ,गुरुजींचे आणि आपल्या मंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पुढील शैक्षणिक जीवनात कुठेही अडचण आली तर आपल्या मंडळाकडे या, मंडळ आपल्याला सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले, सध्या प्राथमिक मराठी शाळेत संगणक आहे, परंतु त्याच्या जोडीला प्रिंटर नसल्याने शाळेतील शिक्षकांची मोठी गैरसोय होते हे सूत्रसंचालक संदीप गमरे यांनी अध्यक्षांच्या लक्षात आणून दिल्यावर लगेचच अध्यक्षांनी लवकरात लवकर प्रिंटर शाळेला मंडळाकडून भेट देण्यात येईल असे आपल्या भाषणात आश्वासन दिले. शाळेतील सत्कार समारंभ आटोपल्यानंतर लगेचच कालकाय देवीच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment