1 जुलै रोजी डॉक्टर्स डे या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन !
डोंबिवली, बातमीदार : 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका, रोटरी क्लब कल्याण सेंट्रल, रोटरी क्लब बिर्ला कॉलेज, रोटरी क्लब कल्याण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
यावेळी दोन संस्थेचे रोटियन 23 आणि रोटर्स 40 यांनी सहभागी झाले होते. रोटरी क्लब आणि डॉक्टर्स डे यानिमित्तावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षी डॉक्टर डे निमित्ताने ब्लड डोनेशन करण्यात येते. यावेळी अध्यक्ष मदन संकलेशा, सचिव पराग कापसे, प्रकल्प प्रमुख मयूर पोपट, डीजी मिलिंद कुलकर्णी, माजी प्रेसिडेंट याकूब जैस्वाल, माजी प्रेसिडेंट अरुण सपकाळे, व्हॉईस प्रेसिडेंट अॅड. शर्मा पटेल, प्रेसिडेंट राम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेकांनी रक्तदान केले.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment