Monday, 4 July 2022

कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न ! *रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व वह्या वाटप करून वाढदिवस साजरा*

कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न !

*रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व वह्या वाटप करून वाढदिवस साजरा*


कल्याण, बातमीदार : कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण विकास फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड आणि अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. त्यासोबतच वृक्षारोपण करून व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.


वाढदिवसा निमित्त कोणताही जल्लोष अथवा वेगळ्या प्रकारे कार्यक्रम न करता सामाजिक उपक्रम व बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आहे. अनेकांना अडचणींच्या काळात रक्त मिळत नाही, रक्तदान हे जीवदान मानले जाते, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनेक गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. त्या शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यासोबत पारनाका परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. राजकारणात काम करत असताना केवळ राजकारण न करता समाजाला आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम केले पाहीजे, समाजाचे आपण देणे लागतो हे लक्षात ठेवून कृती केली पाहिजे, त्याच प्रेरणेतून सामाजिक उपक्रम राबविल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.


दरम्यान राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे विजय सिंह परदेशी यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनिल पंडित, नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेवक दया गायकवाड, मेघा खेमा, राजाभाऊ पातकर, रवि पवार, मनिषा केळकर, नवनाथ पाटील, अनंता पाटील, शैलेश पाटील, शहर उपाध्यक्ष मयुरेश आगलावे, संतोष षिंगोळे, मुन्ना रईस, यशवंत मिरकुटे, जनार्दन कारभारी, सुहास चौधरी, विवेक जाधव, निखिल चव्हाण, नितिन चौधरी, श्याम मिरकुटे, सदा कोकणे, रमेश कोनकर, भरत कडाली, किशोर खैरनार, रोहन पारेकर, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे सचिन पितांबरे, राजेश चसकर, संजय पैठणकर, अतुल धुमाळ, निशिगंधा वणसूत्रे, भाऊसाहेब एरंडे, अभिलाषा पवार, पल्लवी चौधरी,तानाजी कर्पे, रमेश मांडवे,राहुल शिंदे,रश्मी पवार, गौरव पवार, स्वानंद काटीकर, संजय कारभारी, अभय लेले, हेमंत गायकवाड, शहर सचिव सुधीर जोशी, वार्ड महिला अध्यक्षा समृध्दी देशपांडे, राजाभाऊ अक्केवार, मकरंद ताम्हणे, जयश्री देशपांडे, रेखा गायकवाड,विष्णू सांगळे, लता पालवे, विकास पाटील सर, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील, अविनाश पाटील, विवेक जाधव, गौरी ताम्हणकर, पप्पू मिश्रा, महेंद्र तिवारी, बिपिन शर्मा, दिपा शाह, स्नेहा मानकामे, जयश्री गोगटे, वर्षा मुसळे, गायत्री धांडे, सायली ताम्हणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शालेय विद्यार्थी, पालक उपस्थित होते. तसेच जॉईंट ग्रुपचे जोशी काका यांनी अवयवदानाबाबत माहिती सांगितली.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...