तहसील कार्यालयाचे स्थलांतर करा ! *मागणीसह शेतकऱ्याचे थकीत मानधन* मिळावे म्हणून 'भाकप' तर्फे धरणे यशस्वी.....
चोपडा, बातमीदार : शेतकरी शेतमजूर यांना दिले जाणारे श्रावण बाळ व इतर योजनांचे गेल्या ५ महिने पासून रखडलेले थकीत मानधन त्वरित मिळावे, तसेच अग्निविर योजना रद्द करावी समाजसेविका तीस्ता सेटलवाल व सहकारिंची मुक्तता करावी आणि चोपडा तहसीलदार कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर करावे या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा शेतमजूर युनियन तर्फे चोपडा तहसीलदार कार्यालयावर सोमवार रोजी धरणे आंदोलन करण्यात आले...
आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अमृत महाजन, शांताराम पाटील, वासुदेव कोळी, ताराबाई हेमाडे ,शशिकला देशमुख, वासुदेव बडगुजर यांनी केले तहसीलदार श्री. गावित यांनी शेतमजूर यांचेशी चर्चा केली, तीत दोन केंद्रीय योजनात अनुदान आले नाही, दोन योजनेत महाराष्ट्र सरकारचे अनुदान आले ते या आठवड्यात मिळेल सांगून इतर मागण्या जिल्हाधिकारी कडे पाठपुरावा करू.
याबाबत सविस्तर असे की. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग महिला/ पुरुषांना महाराष्ट्र शासनातर्फे श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना, संजय गांधी योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, अंतर्गत दरमहा एक हजार रुपये मानधन दिले जाते, कुटुंब अर्थसाह्य योजने अंतर्गत मदत केली जाते परंतु गेल्या तीन ते पाच महिन्यापासून या दुर्बल घटकांना मानधन मिळाल्याने त्यांना आजारपण व उदरनिर्वाह साठी आर्थिक कुचंबणा सहन करावी लागत आहे. या मूळ मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या सर्व योजना अंतर्गत किमान तीन हजार रुपये पेन्शन शासनाने द्या वे, प्राधान्य क्रमाचे लाभार्थी यांना शिधापत्रिके वर धान्य द्यावे. *गुजरात दंगलीतील हत्याकांड प्रकरणी भाजप मोदी सरकारविरुद्ध कायदेशीर लढाई करणाऱ्या समाजसेविका तीस्ता सेटलवाड यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्तता करावी अग्निविर योजना रद्द करून पूर्वीच्या लष्कर भरती प्रमाणे भरती करावी. *चोपडा तहसीलदार कार्यालय या जागेत आहे ती जागा अत्यंत अडचणीची व अपूर्ण असून सावित्रीबाई फुले स्कूल मागील जागेवरती बांधलेल्या ठिकाणी स्थलांतर करावे* या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सरलाबाई देशमुख, रतिलाल भिल, सुखदेव भिल, वसंत पाटील, गणेश माळी, अंबालाल राजपूत, वना माळी, गिताबाई माळी, सुमनबाई माळी, वासुदेव पाटील, अक्काबाई बडगुजर आदी पदाधिकारी कार्य करते यांचा आंदोलनात समावेश होता. आंदोलनासाठी लासुर, वराड, धनवाडी, वर्डी, मोहिदा, वडोदा, अजंती सिम, अडावद, गोरगावले खुर्द, चोपडा शहर मधून शेतकरी शेतमजूर आले होते..



No comments:
Post a Comment