Monday, 4 July 2022

तालुक्या बाहेर वास्तव्यास असणारे अधिकारी मुरबाड मधिल आपत्तीजनक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार कसे ? **अधिकाऱ्यांचे तालुक्या बाहेर वास्तव्य.**

तालुक्या बाहेर वास्तव्यास असणारे अधिकारी मुरबाड मधिल आपत्तीजनक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार कसे ? **अधिकाऱ्यांचे तालुक्या बाहेर वास्तव्य.**


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : दरवर्षा प्रमाणे सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढत असुन,अचानक ओढावणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असली, तरी मुरबाड तालुक्यातील अनेक खात्याचे प्रमुख अधिकारी तालुक्या बाहेर वास्तव्य करीत असल्याने अचानक ओढावणा-या आपत्ती जनक काळातील परिस्थिती कसे नियंत्रित करु शकतील असा प्रश्न निर्माण झाला असुन, अधिका-यांच्या मनमानी आणि ख्याली खुशाली कारभाराने तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
           पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे चोवीस तास कार्यरत आहेत.मात्र मुरबाड तालुक्यातील प्रशासनाचा केंद्र बिंदू असलेले तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण अधिकारी, कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता, गटशिक्षणाधिकारी, ह्या खात्यांचे प्रमुख अधिकारी तालुक्याचे ठिकाणी वास्तव्य करीत नसल्याने अतिवृष्टीमुळे माळशेज घाटातील कोसळणाऱ्या दरडी, ग्रामीण भागात कोसळणारी घरे, त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना, तसेच तालुक्यात असणारी धरणे यांनी पातळी ओलांडल्यावर उद्भवणारी गंभीर परिस्थिती तसेच मुरबाड शहरात असणाऱ्या उंच इमारती त्यांची होणारी पडझड, आणि शहराचे सभोवताली असणाऱ्या परिसरात जेव्हा पाणी साचते त्यावेळी अनेक घरांमध्ये ते पाणी शिरत असल्याने अर्ध्या रात्री नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घरदार सोडावे लागते . अशा वेळी ओढावणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणे अगोदर जागृत नागरिक धावत असतात.आणि सर्व परिस्थिती आटोक्यात आली असता शासकीय यंत्रणा नेहमी प्रमाणे पंचनामे करण्यासाठी धडपडत असते. हे टाळण्यासाठी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा ही जरी सतर्क ठेवण्यात येत असली तरी ती यंत्रणा राबविण्यासाठी जबाबदार अधिकारी हे मुख्यालयी वास्तव्यास राहणे हे अत्यावश्यक आहे.

           *** नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.जे अधिकारी मुख्यालयी वास्तव्य करीत नाहीत. त्यांना तात्काळ आदेश काढण्यात येतील. राजेश नार्वेकर . जिल्हाधिकारी ठाणे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...