७ जुलै २०२२ रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात लक्षवेधी जुगलबंदी ! शाहीर उमेश पोटले शाहीर सुशीलकुमार धुमक यांच्यात होणार शक्ती-तुराचा जंगी सामना.!
*( निवोशी / गुहागर - उदय दणदणे )*
कोकणातील निसर्ग सौंदर्य अख्या जगाला भुरळ घालते.कोकणच्या लाल मातीत परशुरामाच्या पावन भूमीत अनेक कला संस्कृती जोपासल्या जात आहेत. कोकणात कित्येक पिढ्यानपिढ्या गावकुशीत जोपासली जाणारी कोकणची बहुप्रिय लोककला कलगीतुरा ( शक्ती -तुरा ) ग्रामीण पासून ते थेट मुबंई / पुणे रंगमंचावर सादरीकरण करून आज अनेक लोककलावंत शाहीर यांनी कोकणच्या लोककलेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचेच आदर्श ठेवत नवनवीन कलाकार व शाहीर आज या शक्ति-तुरा लोकलेत पदार्पण करत आहेत त्यांना व्यासपीठ देण्याचे काम आज अनेक आयोजक मंडळी करत आहेत.
मुबंई रंगमंचावर कलगीतुरा नृत्य (शक्ती-तुरा ) जंगी सामन्यांचे विविध ठिकाणी आयोजन होत असून दिनांक- ०७ जुलै २०२२ गुरुवार रोजी रात्रौ.०८ वा.३० मी. मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले (पु) मुबंई येथे कोकणातील लोककला आयोजनात अग्रेसर असणारी संस्था *श्री पाणबुडी देवी कलामंच (मुंबई) निर्मित व ना.गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय, * कोतळूक ता. गुहागर जि. रत्नागिरी विद्यालयाचे माजी विद्यार्थी, श्री संजय आगिवले, श्री रमेश भेकरे, श्री दिनेश दवंडे, श्री तुषार कावणकर , श्री दिनेश वाघे आयोजित गुहागर तालुक्यातील कोतळूक गावचे निवृत्त शिक्षक यांच्या *जाहीर सत्कार सोहळ्याचे* औचित्य साधून रसिकांच्या मनोरंजन प्रति कोकणची बहुप्रिय लोककला *जाखडी नृत्य" (शक्ती-तुरा )जंगी सामना २०२२* सुप्रसिद्ध शाहिर.विजय पायकोळी आणि शाहिर रामचंद्र घाणेकर या सुपरहिट यशस्वी जोडीनंतर सदालाल घराण्यातील आणि शंभूराजू घराण्यातील दोन युवा शाहिरांची या मोसमातील लक्षवेधी अशी जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळणार आहे.
अनेक सामाजिक संघटनावर पदभार सांभाळत विविध काव्य लेखन करून समाज प्रबोधन करत "झी मराठी व कलर्स मराठी" वाहिनीवर कार्यक्रमात *"नवीन भूत हे जन्माला आल इंटरनेट फेसबुक व्हाट्सपवाल"* आणि *"हल्ली बायको नवऱ्या पेक्षा माणूस मोबाईल जपतंयर"* हि गाणी आपल्या लेखणीतून लिखाण करून सुप्रसिद्ध शाहिर विजय पायकोळी यांच्या आवाजात स्वरबद्द केली आहेत मुंबईच्या रंगमंचावर तसेच गाव ठिकाणी देखील त्यांनी आपल्या लेखणीतून रसिकांना आपलेसे करून घेतले आहे.आपल्या काव्यकल्पनेच्या जोरावर अनेक वाचकांना आपल्या लेखणीचे वेड लावले आहे असे लेखणीचे जादुगार - *शक्तीवाले कवी/शाहीर : उमेश पोटले* (म्हसळा) *शाखा-* काळभैरव प्रसन्न नाच मंडळ मु.चिचोडे पो.पाभरे ता. म्हसळा जि. रायगड आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी शाहीर असणार आहेत.
गेली १३ वर्षे ग्रामीण व मुबंई ठिकाणी समाजप्रबोधत्मक कार्यक्रम करून रसिकांच्या पसंतीस उतरलेले, प्रतिस्पर्धी शाहिरांनाही आपले गुरुस्थानी मानणारे, *"माझ्या कोकणात रत्न महान"* या गाण्याचे कवी-गायक मनोरंजनाचा हुकमी एक्का- *तुरेवाले कवी/ शाहीर : सुशीलकुमार धुमक* (गुहागर) *शाखा-* सहकारी कला पथक
निवोशी (भेलेवाडी) ता. गुहागर जि. रत्नागिरी
अशा दोन युवा शाहिरांच्यात ही लक्षवेधी अशी दर्जेदार मनोरंजनाची जुगलबंदी होणार असून अवघ्या कोकण कला विश्वाचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागून राहिले आहे. अधिक माहिती करीता श्री.रमेश भेकरे- ९५९४३५२८६३ श्री.संजयआगिवले- ९५६१४७३९६१ श्री.उदय दणदणे - ८२७५६२७६३६ श्री.उमेश पोटले - ९२२१३५३१७७ यांचेशी संपर्क साधावा तरी तमाम कोकण कलाप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment