*[ ठाणे:- उदय दणदणे ]*
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख माननीय. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज २७ जुलै रोजी वाढदिवस असून माननीय उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विरार येथे साईनाथ नगर शाखेच्या वतीने आज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत *निष्ठावंत शिवसैनिकांची स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे.* हिंदुहृदयसम्राट माननीय. श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे आपण कट्टर शिवसैनिक म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेब, मा. आदित्य ठाकरे साहेबांसोबत आहोत हे अपल्याला साईनाथ नगर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वाक्षरी रुपी आजच्या वाढदिवसाच्या आपल्या थेट शुभेच्छा मोहिमेच्या लावलेल्या भव्यदिव्य फलकावर आपली स्वाक्षरी करून शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत असे आवाहन आयोजक- विरार उपशहर प्रमुख श्री प्रसाद प्रकाश मिर्लेकर यांनी केले आहे.
त्यांच्या वतीने नुकतंच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. माननीय उध्दव ठाकरे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त साईनाथ नगर विरार पूर्व येथे सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आज आधार कार्ड शिबीर, सुकन्या समृद्धी योजना, ( पोस्टाची ठेवी योजना- RD) असे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी साईनाथ नगर व विरार येथील रहिवाशांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन आवश्यक सदर योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान विरार उपशहर प्रमुख /आयोजक -प्रसाद मिर्लेकर विभाग प्रमुख- जितेंद्र खाडये शाखा प्रमुख- जोगेंद्र वारीशे, उपशाखा प्रमुख- राजेश अवेरे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment