Wednesday, 27 July 2022

मुरबाड महावितरणच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी !! **अंगावर तार पडून आदिवासीचा मृत्यू **

मुरबाड महावितरणच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी !! 
 **अंगावर तार पडून आदिवासीचा मृत्यू ** 


मुरबाड- ( मंगल डोंगरे ) : अवघ्या चारच दिवसापूर्वी मुरबाड मधील एका नवतरुण वायरमनचा ट्रान्सफार्मरवर शाॕकलागुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. हि घटना ताजी असतानाच तालुक्यातील असोसे येथील एका ६० वर्षाच्या आदिवासीचा शेतात काम करत असताना अंगावर तार पडून मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तालुक्यातील असोसे येथील आदिवासी बांधव कै. तुकाराम परसु मुकणे हे दि. २३/०७/ २०२२ रोजी नेहमी प्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी एका शेतकऱ्याच्या शेतावर मजुरीत कामावर गेला होता. अचानक शेताच्या कडेने गेलेली विजेची तार तुटून तुकाराम मुकणे यांच्या अंगावर पडली व यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुरबाड घुट्याची वाडी येथे काम करत असताना माल्हेड येथील नवतरुणाचा शाँक लागुन म्रुत्यु झाला. या घटनेला अवघे चारच दिवस होतात .तोच महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने दुसरा बळी घेतला आहे. सततचा दुर्लक्षितपणा, जीर्ण झालेल्या तारा, विजेचे खांब, ट्रान्सफार्मर यांच्यासाठी महावितरणने आजपर्यंत करोडो रुपये खर्च केले आहेत. तरी सुद्धा तालुक्याची लाईट एक हवा का झोका आला की गायब होते ,ती दोन - दोन दिवस येतच नाही. कधी गाई, म्हैशी तर कधी रस्त्यावर चालणाऱ्या माणसांच्या अंगावर तारा पडून नाहक जिव गेल्याच्या घटना घडत आहेत . तरीसुद्धा कोणतेही सोयरसुतक नसलेले महावितरणचे अधिकारी बघ्याची भुमिका घेत आहेत. अशा या महावितरणचे करायचे काय असा प्रश्न मुरबाडकर करत असून मयत तुकाराम मुकणे यांच्या नातेवाईकांना योग्य न्याय न मिळाल्यास विज कार्यालयावर आदिवासी एकता परिषदेच्या वतिने आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...