Wednesday, 27 July 2022

**मुरबाड तालुक्यात रास्त भाव धान्य दुकानात प्लास्टिकचे तांदूळ आल्याने खळबळ ** **तात्काळ कारवाईसाठी रिपाई अध्यक्ष दिनेश उघडे यांचे तहसिलदारांना निवेदन**

**मुरबाड तालुक्यात रास्त भाव धान्य दुकानात प्लास्टिकचे तांदूळ आल्याने खळबळ **
**तात्काळ कारवाईसाठी रिपाई अध्यक्ष दिनेश उघडे यांचे तहसिलदारांना निवेदन**


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : आधीच उपवास त्यात फाल्गुन मास, म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अशी वेळ आता मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधंवांवर आल्याची घटना घडली असून, दुष्काळत तेरावा महिना, एकतर कधी- कधी वेळेवर, तर कधी अवेळी, अपुऱ्या अवस्थेत सरकारी रास्तभाव दुकानात धान्य येते ते उशिराच गोर गरींबांपर्यत पोहचते. कधी कधी त्याची वाट बघता-बघता महिना कुठे निघून जातो. ते कळत नसताना आता कुजके सडके धान्य खावुन जगत असताना, मायबाप सरकारने गोरगरीब आदिवासी बांधवांची तर क्रुर चेष्टाच सुरु करून, चक्क रास्तभाव धान्य दुकानावर प्लास्टिकचे तांदूळ पाठवल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तात्काळ चौकशी करून दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी रिपाईचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांनी मुरबाडचे तहसीलदार संदिप आवारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
           मात्र याबाबत मिळालेली माहिती अशी कि,मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील मौजे मोरोशी, गणेशपुर येथील रास्तभाव दुकानदाराने आदिवासी बांधवांना धान्य वाटप केले होते. त्यातील तांदूळ त्या आदिवासी बांधवांनी भाकरी साठी पिठाच्या चक्कीत दळण्यासाठी दिले असता. चक्कीवाले लाड्या राघो मेंगाळ, यांना दोन प्रकारचे तांदूळ आढळल्याने संशय आला, तेव्हा त्यांनी ते तांदूळ तेथील डॉक्टराना दाखविले असता, सदर तांदूळ खाण्यास योग्य नसुन, प्लास्टिकचे असल्याचे सांगण्यात आले. हि बाब दूर्दैवी असुन, आदिवासी बांधवांच्या जिविताशी खेळ खेळण्यासारखी आहे. म्हणून असा खेळ खेळणा-यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी रिपाई मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांनी मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली असुन, तहसीलदार संदिप आवारी यांनी, असा प्रकार घडला असल्यास अन्न व औषध प्रशासना कडून त्याची तपासणी करून, संपूर्ण चौकशी अंती कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ***मात्र कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उघडे यांनी दिला आहे.***

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...