Tuesday, 26 July 2022

नवभारत छात्रालय परिवार दापोली आणि अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस् दापोली यांच्यातर्फे मु.आंबडस ता.खेड येथे मोफत रोपे वाटप !

नवभारत छात्रालय परिवार दापोली आणि अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस् दापोली यांच्यातर्फे मु.आंबडस ता.खेड येथे  मोफत रोपे वाटप !


मुंबई, (शांताराम गुडेकर) :                                          दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कुणबी सेवा संघाच्या नवभारत छात्रालय परिवारा तर्फे मु. आंबडस, ता. खेड येथील शेतकऱ्यांना प्रत्येकी चार कोकम रोपे तर अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस् दापोली यांचे तर्फे प्रत्येक शेतकऱ्याला दोन काळीमिरी रोपे मोफत देण्यात आली. हा कार्यक्रम आयोजित करण्यात समन्वयकाची भूमिका मुख्याध्यापक, न्यू. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज आंबडस, ता. खेड, जि. रत्नागिरी यानी पार पाडली.


            या कार्यक्रमात मु. आंबडस गावातील शेतकऱ्यांना १८० कोकम रोपे आणि ९० काळीमिरी रोपे व शाळेच्या आवारात लावण्यासाठी संस्थेकडून १० काकडा रोपे व अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस् मधून ४ फुलझाडे व १ नारळ रोप मोफत देण्यात आले. या प्रसंगी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे सर, नवभारत छाञालय परिवाराचे अध्यक्ष डाॅ. प्रमोद सावंत, कुणबी सेवा संघाचे सरचिटणीस श्री. हरिश्चंद्र कोकमकर, खजिनदार श्री. प्रदिप इप्ते, सदस्य श्री. दिनेश राणे, श्री. बाळकृष्ण भुवड तसेच आंबडस - चिरणी गावचे सरपंच श्री. आंब्रे, हायस्कूल कमिटी चेअरमन श्री. निर्मळ सर, मुख्याध्यापक श्री. खेडेकर सर, या कार्यक्रमाचे नियोजक शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार विजेते श्री. बांबाडे सर तसेच गाव कमिटी अध्यक्ष, उद्योजक व मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेंद्र बांबाडे सर यांनी केले. यावेळी प्रा. प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना लागवडीचे महत्त्व आणि लागवडी संबंधिची सविस्तर माहिती उदाहरणासह पटवून दिली. त्याचप्रमाणे कुणबी सेवा संघाच्या विविध उपक्रमांची पुस्तिका सर्वांना देण्यात आली. तसेच प्रा. प्रभाकर शिंदे यानी स्वतः पर्यावरण प्रेमी डॉ. दिलीप कुलकर्णी लिखित  'स्वप्नामधील गावां' हे पुस्तक हायस्कूल शिक्षकांसाठी भेट दिले. त्याचप्रमाणे  मु. आंबडस गावचे प्रगतीशील  शेतकरी श्री. जाधव यांना विद्यापीठाची माहिती पुस्तिका (दैनंदिनी) स्वतः प्रा. प्रभाकर शिंदे सर यांनी भेट दिली. शेवटी गावचे सरपंच, मुख्याध्यापक, चेअरमन या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे निवेदन श्री. सचिन चिले सर यांनी केले व श्री. कुंभार सर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन ! पेण (पंकजकुमार पाटील) :  पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ता...