Tuesday, 26 July 2022

कांबा पाचवामैल येथील कातकरी मजूराची भिंत कोसळली, उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत ?

कांबा पाचवामैल येथील कातकरी मजूराची भिंत कोसळली, उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पाचवामैल येथील अशोक सुक-या वाघे या कातकरी मजूरांचे घरांची भिंत रात्रीच्या सुमारास कोसळली, मुसळधार झालेल्या पावसामुळे उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही.


कल्याण तालुक्यात जो काही थोडाफार कातकरी समाज शिल्लक आहे, त्यापैकी कांबा ग्रामपंचायत हद्दीत पाचवामैल येथे आहे. या ठिकाणी राहणारे अशोक सुक-या वाघे, वंदना अशोक वाघे, मुलगा प्रकाश वाघे, मुकेश वाघे आणि कार्तिक वाघे असे ५ सदस्य असलेले कातकरी कुंटूब राहत असून उन्हाळ्यात वीटभट्टी, पावसाळ्यात, मासेमारी भातलावणी, जंगलातील कंटोली व इतर भाजीपाला विकून व मजूरी करून कुंटूबियाचा उदरनिर्वाह करत आहेत, घराची अवस्था अंत्यत बिकट झाली असताना या गोरगरीब जनतेपर्यंत पंतप्रधान आवाज योजना, शबरी योजना, किंवा कोणत्याही घरकुल योजना यांच्या पर्यंत पोहचल्या नाहीत, यावरून "विकास, व अच्छे दिन" कोणासाठी हे वेगळे सांगण्याची गरज नाही.


गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कांबा पाचवामैल येथें राहणाऱ्या अशोक सुक-या वाघे यांच्या घराच्या भिंती दुभंगलेल्या आहेत,अनेक भिंती ला तड्डे गेलेले आहेत, मागील बाजूस भिंतीला लाकडाचा टेकू लावला आहे, सर्व घरच धोकादायक झाले आहे. ते कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यांच्या घरांची पुर्वेकडील भिंती रात्री कोसळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणाच्याही जिवीतास धोका झाला नाही.

*विकास व अच्छे दिन कोणासाठी

-देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सबका साथ सबका विकास ,तसेच अच्छे दिन या ना-याची घोषणा केली होती. परंतु देश, राज्य, जिल्हा, तालुका ते गावा गावात आज श्रीमंत व गरीब ही दरी दिवसेंदिवस वाढत आहे, आजही गोरगरीब, कातकरी, आदिवासी, दलित समाजावर भयानक अन्याय, अत्याचार, होत आहेत, त्यांना पाणी, आरोग्य, चांगला पोषण आहार, दिवाबत्ती, रस्ते,निवारा आदी मुलभूत सोईसुविधा मिळत नाही. यावरून नेमका कोणाचा "विकास" झाला व कोणाला "अच्छे दिन" आले हे वेगळं सांगायला नको, सरकार खुर्चीत मशगुल असताना सुरत, गुवाहाटी, आणि दिल्ली अशा वा-या संपलेल्या असतील तर जरा या गोरगरीब मतदात्याकडे थोडेफार लक्ष द्यावे अशीच तमाम जनतेची इछा आहे.

No comments:

Post a Comment

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन ! पेण (पंकजकुमार पाटील) :  पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ता...