Saturday, 2 July 2022

मानपाडा पोलिसांची कारवाई ! ४७ लाख रुपयांच्या किमतीच्या गांजासह दोन आरोपी गिरफ्तार !!

मानपाडा पोलिसांची कारवाई ! ४७ लाख रुपयांच्या किमतीच्या गांजासह दोन आरोपी गिरफ्तार !!


डोंबिवली, बातमीदार : डोंबिवलीमध्ये गांजा तस्करांना पकडून पोलिसांनी 272 किलो गांजा जप्त
 केला आहे.  मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मानपाडा पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे


पोलिसांना उंबार्ली गावातील मोकळ्या मैदानात उभी असलेली इनोव्हा कार संशयास्पतरीत्या उभी असलेली आढळून आली त्यामुळे तिची चौकशी केली असता त्यामध्ये विविध पिशव्यांमध्ये गांजा भरून ठेवल्याचे आढळून आले.

अटक केलेल्या आरोपींची नावे फैजल फारुख ठाकूर आणि मोहम्मद आतीफ हाजीजउल्ला अन्सारी अशी आहेत. अन्सारी हा भिवंडी येथे राहणारा आहे. तर फैजल हा मुंबईतील माजगावचा रहिवासी आहे. या दोघांकडे २७२ किलो गांजा मिळून आला आहे.

कल्याण डोंबिवलीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक (प्रशा) सुरेश मदने हे करीत आहेत. सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे व पोनिरी. शेखर बागडे करत आहे.


No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...