Thursday, 21 July 2022

कल्याण मधील महावितरणाच्या विजेच्या उच्च दाबाच्या विद्युत तारा नागरीकांच्या जिवावर ! "गौरीपाडा, टावरीपाडा, बारावे "परिसरातील नागरिकांच्या तक्रारी....

कल्याण मधील महावितरणाच्या विजेच्या उच्च दाबाच्या विद्युत तारा नागरीकांच्या जिवावर !

"गौरीपाडा, टावरीपाडा, बारावे "परिसरातील नागरिकांच्या तक्रारी....


कल्याण पश्चिम, बातमीदार- गौरीपाडा परिसरातील टावरीपाडा- न्यु इंदिरानगर गणेश नगर परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी घ्या विजेच्या तारा एवढ्या खाली असल्याकारणाने परिसरातील नागरिकांना या खाली आलेल्या तारा कधी एखाद्याचा जिवावर बेतू शकते सांगू शकत नाही.या खाली आलेल्या तारांमुळे या परिसरातील कोणतीही अग्निशमन दलाची ,कचऱ्याची गाडी, मलनिःसारण गाडी या परिसरात प्रवेश करू शकत नाही अशी गंभीर परिस्थिती येथे असून एखादा अपघात झाल्यास अग्निशमन दलाची गाडी परिसरात जाऊ शकत नाही, कचरा व मलनिःसारण गाडी आत मध्ये जाऊ शकत नसल्याने कचरा उचलणे हे महानगरपालिका पालिका कर्मचाऱ्यां समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.


त्याच प्रमाणे बारावे येथील महात्मा फुले कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळेतील पटांगणात सूद्धा तारा अतिशय जवळून जात असल्याकारणाने शाळेच्या मुख्याध्यापिकांनी याबाबत वारंवार तक्रार महावितरण कडे केली आहे ,तसेच गुरुआतमन चौक येथील वृंदावन सोसायटी येथील गेट समोरच महावितरणचा खांब असल्याने तेथीही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशा तक्रार नागरिकांनी केल्या आहेत. एक महिन्याचे विज बिल थकल्यावर विज पुरवठा खंडित करण्यासाठी जी तत्परता कर्मचारी दाखवतात तीच तत्परता नागरिकांच्या जिवावर बेतू शकतात अशा विद्युत् वाहक विजेच्या तारांचे नियोजन तत्परतेने करतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यावर किती तत्परता दाखवतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.


संबंधित बारावे महावितरण कार्यालयाला याबाबत तारांच्या नियोजनासाठी पत्र देण्यात आले असून तक्रारींचा सर्व्ह करू अशी माहिती मिळाली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...