जव्हार- जितेंद्र मोरघा :
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत ठाण्यातील मोहन महल येथे मोफत कॉम्प्युटर क्लासची सुरुवात करण्यात आली. या क्लासचा उद्घाटन सोहळा आदरणीय भगवान महादेव सांबरे यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा भावनादेवी भगवान सांबरे, सचिव केदार चव्हाण, परेश कारंडे, संदीप धवडकर व जिजाऊ सदस्य आदी उपस्थित होते. या कॉम्प्युटर क्लासच्या माध्यमातून डिटीपी, डिजीटल मार्केटींग व सोशल मिडीया मॅनेजमेंटचे मोफत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. वर्षभरात साधारण १२०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

No comments:
Post a Comment