Thursday, 21 July 2022

सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक या विषयावर परिवहन समितीची सभा संपन्न !

सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक या विषयावर परिवहन समितीची सभा संपन्न !


जळगाव,— (प्रतिनिधी) :
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. सु.ग.देवकर प्रायमरी स्कूलमध्ये ' विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक' या विषयावर परिवहन समितीची सभा संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .सदर सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साधना महाजन होत्या. कार्यक्रमास शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.सुकदेव थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित रिक्षा चालक-मालक बंधूंना उपशिक्षक श्री.प्रशांत साखरे यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक विभागाचे अधिकारी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री.ऋषिकेश महाले साहेब,शहर वाहतूक शाखेचे पोलीस प्रशिक्षक श्री.मुजफ्फर सय्यद साहेब,वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री.दिलीप सपकाळे यांची विशेष उपस्थिती होती.प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित रिक्षा चालकांना सुरक्षित वाहतूक,विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी,गाडीची कागदपत्रे, गाडीचा मेंटेनन्स, आरोग्याची काळजी, वाहतूक नियमांचे पालन, वाहतुकीची शिस्त , इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन परिवहन समिती प्रमुख श्री.सागर पाटील तर आभार पालक शिक्षक संघाचे चिटणीस श्री.नंदकिशोर ढोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...