Monday, 25 July 2022

मतदारांच्या याद्यात घोळ दूर न झाल्यास न्यायालयात धाव घेणार "भाजप कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे" यांचा प्रशासनाला इशारा घेतली प्रभाग अधिकाऱ्याची भेट !

मतदारांच्या याद्यात घोळ दूर न झाल्यास न्यायालयात धाव घेणार "भाजप कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे" यांचा प्रशासनाला इशारा घेतली प्रभाग अधिकाऱ्याची भेट !


कल्याण, बातमीदार - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला आहे. याद्यांमधील घोळ दूर न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला आहे. 

शहराध्यक्ष म्हात्रे यांनी आज ब प्रभागाचे अधिकारी किशोर ठाकूर यांची भेट घेतली. या प्रसंगी अर्जुन म्हात्रे, स्वप्निल काठे, अर्जुन भोईर, शाम मिरकुटे, अशोक मिरकुटे, प्रीती दिशित, कल्पना पिल्ले, शिवसेनेच्या अनघा देवळेकर आणि साईनाथ तरे, मनसेचे गणेश नाईक हे देखील उपस्थित होते. महापालिकेने निवडणूकीसाठी १३३ प्रभागांच्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. या मतदार याद्यांवर हरकती सूचना मागविल्या होत्या. मतदार याद्यांवर हजारो मतदार आणि लोकप्रतिनीधींनी हरकती नोंदविल्या होत्या.  हरकती नोंदविण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून मुदत वाढ दिली गेली. अंतिम मतदार यादी महापालिकेच्या निवडणूक प्रशासनाकडून प्रसिद्ध केली गेली आहे. त्याच्या हरकती सूचनांची सुनावणी झालेली नाही. महापालिकेच्या मतदार याद्यांवर मागविलेल्या हरकती सूचनांची सुनावणी घेतली गेली नाही. प्राधिकृत अधिका:यांना त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार असतो. मात्र प्रभाग क्रमांक तीनमधील ९ हजार मतदार हे प्रभाग क्रमांक चारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हा घोळ दूर करण्यासाठी भाजपच्या वतीने हरकती घेण्यात आल्या. त्यावर त्यांनी यासंदर्भातील पुरावे मागितले. पुरावे दिल्यानंतरही यादीतील घोळ दूर झालेला नाही. त्यासाठी आज पुन्हा म्हात्रे यांच्या पुढाकारने प्रभाग अधिकारी ठाकूर यांची भेट घेण्यात आली. हा घोळ दूर न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.नाही तर आम्ही आदोलन करू. यावेळी सर्वपक्षीय बीजेपी, शिवसेना ,मनसे, मिळून वार्ड क्रमांक ब प्रभाग अधिकारी किशोर ठाकूर यांच्याकडे तक्रार केली.पण त्याकडे त्याचे लक्ष नाही.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...