कल्याण, बातमीदार : ओम शिव साई विश्वकर्मा सेवा संस्था डोंबिवलीच्या वतीने गेल्या अठरा वर्षांपासून सोमवारी पूर्वेकडून यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नाही, मात्र यंदा दोन्ही बाजूने यात्रा काढण्यात आली. शिवशाही विश्वकर्मा सेवा संस्थेचे अध्यक्ष रामजी विश्वकर्मा यांनी श्रावणी यात्रेत उपस्थित सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या व येणारा दिवस चांगला आणि आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना केली.
यात्रेचे विशेष म्हणजे या कावरीया यात्रेत मोठ्या संख्येने महिला मंडळांनी बोल बम च्या घोषणा देत आपली उपस्थिती दर्शवली आणि उत्साहात डोंबिवली पिंपळेश्वर मंदिर ते अंबरनाथ शिव मंदिर यात्रेला सुरुवात करण्यात आली.उद्योगपती सागर दुबे यांनी षिवभक्तांचे स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिवभक्त शैलेंद्र शर्मा, संजय विश्वकर्मा, मुसाफिर मल्ला, रवींद्र शर्मा, भगवान विश्वकर्मा, राम लखन पाल, वीरेंद्र गुप्ता, रामलाल विश्वकर्मा, रामजी पाल आदी कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग मिळाला. तसेच सर्व भक्तांचे संस्थेचे अध्यक्ष रामजी विश्वकर्मा यांनी स्वागत व आभार मानले.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण


No comments:
Post a Comment