नाईट ग्रुपच्या वतीने कावेरी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना दूध व फळे वाटप !
डोंबिवली, बातमीदार : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटना नाईट ग्रुपच्या वतीने कावेरी पदयात्रेत भव्य स्वरुपात सहभागी झालेल्या भाविकांना दुधाची खीर व फळांचे वाटप करण्यात आले. असे यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
गेल्या वेळेपासून आम्ही भाविकांना आणि नागरिकांना महाप्रसादाचा लाभ देत आहोत, गेल्या काही वर्षांत आम्हाला प्रवासाचा लाभ मिळाला. कोरोनाचा प्रभाव कमी झाला, याचा खूप आनंद होत आहे. भावी प्रवासात जाणाऱ्यांचे स्वागत दरवर्षी प्रमाणे महाप्रसादाने करत आहे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदू परब, दिनेश पांडे, मुकेश पांडे, संतोष यादव, तुलसी पाल, अवधेश यादव, विलास भुजंग, धर्मेंद्र पाल, राम आशिष पाल, जगदीश पाल, सचिन यादव, संजय पाल, सुरेंद्र पाल व डोंबिवलीच्या नाईट ग्रुप रिक्षा स्टँडचे सर्व पोस्ट अधिकारी, कामगार, रिक्षा चालक यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment