"संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, पत्रकार, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, ग्रामविकास मंडळे व तालुक्यातील नागरिकांकडून आमरण उपोषणास मोठ्या प्रमाणात पाठिंबा"
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर ) :
नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकावर थांबा मिळविण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांनी एकजुटीने आयोजित केलेल्या १५ ऑगस्ट २०२२ (स्वातंत्र्यदिनी) ला आमरण उपोषणाला सर्वस्तरातून प्रतिसाद वाढत आहे. निसर्गरम्य चिपळूण- निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुप समुहातर्फे समुहप्रमुख पत्रकार संदेश जिमन आणि सहकारी स्वातंत्र्यदिनी संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक परिसरात कोवीड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून आमरण उपोषण करणार आहेत.या सनदशीर आंदोलनाला संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, पत्रकार, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, ग्रामविकास मंडळे व तालुक्यातील नागरिकांकडून आमरण उपोषणास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, असल्याची माहिती सदर ग्रुपतर्फे पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.
कोकण रेल्वे प्रत्येकवेळी विविध रेल्वे आरक्षणाचे कोटे संगमेश्वर रोड स्थानकासाठी तिकीट आरक्षण संख्या कमी असल्याचा दावा करत आहे. या स्थानकात एकूण अप-डाऊन अशा दहा गाड्या थांबतात. पण काही गाड्या अवेळी येत असल्याने प्रवाशांना आपल्या गावात जाण्या-येण्याचा त्रास असल्याने गैरसोयीचे ठरते. मनस्ताप तसेच आर्थिक भुर्दंडामुळे शेकडो प्रवासी त्रस्त आहेत. नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या दिवसाउजेडी येत असल्याने प्रवाशांच्या सोयीच्या ठरतील. त्यामुळे तमाम संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांच्या वतीने हे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संदेश जिमन यांनी दिली.उपोषणाच्या ठिकाणी कोवीड संदर्भातील सर्व नियम पाळले जातील. पण त्यावेळी उपोषणास काही गालबोट लागले व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला कोकण रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा संदेश जिमन यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment