Monday, 25 July 2022

विशेष पोलीस महानिरीक्षक बेलापूर मुंबई व रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते चांगल्या कामगिरी बाबत हवालदार श्री. विनोद बाबुराव भितळे यांचा सन्मान !

विशेष पोलीस महानिरीक्षक बेलापूर मुंबई व रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते चांगल्या कामगिरी बाबत हवालदार श्री. विनोद बाबुराव भितळे यांचा सन्मान !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर /दिपक फणसळकर) :
          विशेष पोलीस महानिरीक्षक बेलापूर मुंबई व रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांच्याहस्ते चांगल्या कामगिरी बाबत हवालदार श्री. विनोद बाबुराव भितळे यांचा सन्मान करण्यात आला. भितले हे १९७६ च्या बँचला जाँईट झालेले पोलीस कर्मचारी आहेत.ते सध्या रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.ते रत्नागिरी लांजा तालुक्यातील तळवडे या गावचे असून ते फार कष्टाळू, मेहनती आणि प्रामाणिक आहेत.त्यांच्या या अथक प्रयत्नातून त्यांनी अनेक केसेसचा योग्यरीत्या तपास केलेला आहे.त्यांच्या या योग्य तपासणी कामाबद्दल त्यांना अनेकदा गौरविण्यात आलेले आहे. यावेळी विशेष केसचा तपास पुर्ण केल्यामुळे त्यांना आधुनिक तपास किट देऊन गौरविण्यात आले व त्यांना पुढील कामगिरी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...