डोंबिवली, बातमीदार : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन कल्याण पश्चिम शाखा ईस्टर्न पॅसिफिक शीपिंग सिंगापूर याच्या वतीने कल्याण व परिसरातील अनाथ आश्रमातील मुलांसाठी मोफत संगणक वाटप दिनांक 23 जुलै रोजी करण्यात आले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन कल्याण पश्चिम शाखा व ईस्टर्न पॅसिफिक शीपिंग सिंगापूर तर्फे कल्याण व आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलांच्या अनाथ आश्रमातील व बाल वसतिगृहामधील मुलांना भविष्यात शिक्षण हे आधुनिक पद्धतीने व संगणकीय शिक्षण मिळावं या उद्देशाने वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून या लॅप टॉपचे वाटप करण्यात आले.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment