Monday, 25 July 2022

**इको चालक, मालक संघटनेच्या स्तूत्य उपक्रम **

**इको चालक, मालक संघटनेच्या स्तूत्य उपक्रम ** 


मुरबाड ( मंगल डोंगरे ) : नियमित पणे प्रवाशांची इकडून तिकडे ने-आण करणारे वाहन चालक-मालक, रोजच्या नित्य कर्तव्य जेव्हा बाजूला ठेवतात. तेव्हा त्यांच्यातली खरी माणुसकी जागृत होते. आणि कुठेतरी खरे कर्तृत्व कर्तबगार माणसाला खुणावते. असाच काहीसा प्रकार मुरबाड -कल्याण रोजचे प्रवाशांची ने-आण कर्तव्य बाजुला ठेवून त्यांनी आपल्या इको चालक-मालक संघटनेच्या वतीने  आपल्या रोजच्या कमाईतून शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व खाऊ घेऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा घोरले येथे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. 


चालक- मालक संघटना मुरबाड ते शहाड यांच्या या उपक्रमासाठी गावचे सरपंच भोईर तसेच सीआरपी ताई गायकर ,चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष सुदामजी भोईर, ठोसर आजी, माणिक कौर, संजय मोरे, निखिल वारघडे, योगेश टोहके, रमेश कोर, नरेश कोर, कल्पेश कोर आणि संघटनेचे पदाधिकारी, सर्व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...