Monday, 25 July 2022

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा चेंबूर ट्रॉम्बे तर्फे वधू वर मेळाव्यास इच्छुक वधू -वरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! मेळाव्यात पदवीधर वर ४३० आणि पदवीधर वधु २५१ असे एकूण ६८१ वधू वरांनी केली नोंदणी

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा चेंबूर ट्रॉम्बे तर्फे वधू वर मेळाव्यास इच्छुक वधू -वरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मेळाव्यात पदवीधर वर ४३० आणि पदवीधर वधु २५१ असे एकूण ६८१ वधू वरांनी केली नोंदणी 


मुंबई उपनगर, ( निलेश कोकमकर /शांताराम गुडेकर ) :
                 कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा चेंबूर ट्रॉम्बे संलग्न कुणबी विवाह सल्लागार मंडळ आयोजित २४ जुलै २०२२ रोजी वधू वर मेळावा आचार्य मराठे कॉलेज चेंबूर घाटला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 


या मेळाव्यात पदवीधर वर ४३० आणि पदवीधर वधु २५१ असे एकूण ६८१ वधू वरांनी नोंदणी करून चागलाच सहभाग दर्शिवला. या उपक्रमाला ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री.चंद्रकांत बावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कुणबी समाजोन्नती संघाच्या संपूर्ण मुंबई मध्ये एकुन १४ शाखा आहेत त्यासाठी मा. चंद्रकांत बावकर यांचा मोठा मोलाचा वाटा आहे तसेच ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी व आपल्या हक्कासाठी सर्वओबीसी यांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. 


यावेळी शाखा चेंबूर - ट्रोम्बे कडून मुलुंड वसतिगृहासाठी दोन लाखाचा धनादेश मा. बावकर यांच्याकडे सुपूर्त केला. मुलुंड येथे उभारण्यात येणाऱ्या समाजाच्या वसतिगृहसाठी प्रत्येकाने हातभार लावावा असे आवाहन व असे मत संघाचे सह सरचिणीस भास्कर चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. लग्न ठरवताना वधू वरांसाठी जन्मपत्रिका ना जुळवत बसताना दोघांमध्ये महत्वाचं काय आहे याचा विचार करून लग्न ठरवले पाहिजे. 


जीवनात यशस्वी होण्यासाठी वधू वरांमध्ये तडजोड करण्याची तयारी असावी तर जीवन नक्कीच यशस्वी होते असे मत मा. बावकर यांनी व्यक्त करून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी कु. स.संघ विभागीय शाखा चेंबूर - ट्रोम्बे शाखाध्यक्ष बाळकृष्ण पुजारे, सचिव केशव निनावे, खजिनदार शैलेश मोसमकर मकर संलग्न कुणबी विवाह मंडळ अध्यक्ष प्रभाकर नागरेकर, सचिव दत्ताराम शिवगण महिला मंडळ सचिव सौ. दिप्ती शिवगण, सदस्य सौ. प्रीती बारगोडे , युवक मंडळ अध्यक्ष निलेश मांडवकर, संघ शाखा सहचिटणीस भास्कर चव्हाण, कु. विवाह मंडळ सल्लागार शांताराम जाधव, राजापूर संमिश्र पतपेढी संचालक विजय भारती, मुलुंड वसतिगृह आर्किटेक प्रकाश शिर्के, संभाजी काजरेकर , संघ कार्यकारणी डॉ. सौ.रुचिता बोलाडे ,माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण संघटनेचे पदाधिकारी पत्रकार/समाजसेवक निलेश कोकमकर, शरद मुंडे , शांताराम भेकरे ,दत्ताराम मोसमकर, राजेश येनारकर, नाना गोंडाळ, शिवराम केकडे, गोविंद पुजारे, बाळकृष्ण दैत, एकनाथ बेलेकर, गोविंद बावकर, सुलोचना बेटकर, जगदीश गोंडाळ, चंद्रकांत बारस्कर, दत्ताराम बारगोडे, शांताराम बेटकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...