Wednesday, 27 July 2022

नुतन बालगोपाळ विद्यार्थी मंडळ ह्या संस्थेचा स्तुत्य उपक्रम ! **देहेरी गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप **

नुतन बालगोपाळ विद्यार्थी मंडळ ह्या संस्थेचा स्तुत्य उपक्रम !

**देहेरी गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : नुतन बाळगोपाळ विद्यार्थी मंडळा तर्फे आज मौजे देहरी शाळेतील, इयत्ता पहिली ते काॅलेज पर्यतंच्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, तसेच वह्या व पेन ह्या वस्तूंचे संस्थेतर्फे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चिपळूणकर व कर्नल अमेय तसेच स्थानिक ग्रामपंचायत सदस्याच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी जवळपास ८० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शकतो ह्या संधीचा फायदा घेतला.


हा कार्यक्रम देहरी गावातील शालेय विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आला होता. सदर संस्था सामाजिक क्षेत्रात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत असुन, संस्थेला आतापर्यंत एकूण ५९ वर्ष झाली आहेत. व संस्था दरवर्षी कुठे ना कुठे सातत्याने शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमांचे आयोजन करत असते.

1 comment:

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...