Thursday, 21 July 2022

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा १३ वा वर्धापन दिन गोवेली आणि खडवली शाखेत साजरा !

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा १३ वा वर्धापन दिन गोवेली आणि खडवली शाखेत साजरा !


कल्याण, नारायण सुरोशे : महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापनेचा १३ वा वर्धापन दिन बुधवार दि २० जुलै रोजी राज्यभरातील बँकेच्या विविध शाखांमध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने खडवली येथील शाखेत देखील मोठ्या जल्लोषात बँकेच्या ग्राहकांना पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.


याप्रसंगी खडवली शाखेचे शाखा व्यवस्थापक महेश चव्हाण यांनी उपस्थित ग्राहकांना बँकेविषयी माहिती देताना सांगितले की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही पूर्णपणे सरकारी बँक असून राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये ४१५ शाखा कार्यरत आहेत. यावर्षी बँकेने २३००० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.बँकेचा सध्याचा गृह कर्ज व्याजदर ६.५% असून या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.

याप्रसंगी एलआयसी टिटवाळा शाखेच्या शाखा व्यवस्थापक विजयलक्ष्मी करंबट यांनी एलआयसीच्या विविध योजनांची माहिती सांगितली.

यावेळी गोवेली शाखेचे व्यवस्थापक एकनाथ मेमाने, अधिकारी सीमा यादव, अभिजीत पालकर, ज्ञानेश्वर कडव, संदीप पोंक्षे आधी अधिकारी कर्मचाऱ्यांसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...