कल्याण, (संजय कांबळे) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करून मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सह त्यांच्या बरोबर फुटीर आमदार व खासदार आदींच्या विरोधात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवनिष्ठा व शिवसंवाद यात्रेला ठाण्यासह भिवंडी, पडघा, शहापूर, मुरबाड तसेच कल्याण ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने जबरदस्त पाठिंबा मिळत असून यामुळे शिंदे गटामध्ये धाकधूक वाढली आहे.
शिवसेनाप्रमुख हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ४०/५० वर्षीपुर्वी शिवसेना स्थापन करून मराठी माणसाच्या मनात स्पुलिंग पेटवले, शिवसैनिक हिच ताकत माणून पक्ष वाढविला,त्यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाची धुरा सांभाळली, अनेक राजकीय नाट्यानंतर भाजपाशी परपंरागत युती तोडून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, सुदैवानं ठाकरे घराण्याला मुख्यमंत्री पद मिळाले, त्यामुळे तमाम शिवसैनिकांसाठी ही अभिमानाची घटना होती, अडीच वर्षाच्या अंत्यत कठीण काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अलोकिक असे काम केले, शांत, संयमी स्वभावाने त्यांनी जनतेसह, अधिकारी व कर्मचारी यांची मने जिंकली, पक्षातील अनेकांना अंत्यत महत्त्वाची पदे,दिली, परंतु एकनाथ शिंदे यांनी नेमकी वेळ साधली व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी केली, इतकेच नव्हे तर आपल्या बरोबर अनेकांना यामध्ये सामील केले,
आतापर्यंत या पक्षफुटीमध्ये आपला काही हात नाही असे म्हणणारे माझी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यामागे कसे कलाकार आहेत हे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर भाषणात सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षानिवास स्थान सोडताना, तसेच ते फेसबुकवर लाईव्ह आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना सहानुभूती मिळत होती. तर दुसरीकडे आपण पदासाठी बंडखोरी केली नाही असे वांरवार सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सर्वोच्च पद घेऊन इतरासाठी दिल्ली वारी सुरू केली. याचा खरपूस समाचार घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या सर्वाविरोधात अंत्यत आक्रमणे भूमिका मांडत संपूर्ण परिसर पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
मुंबईतील शिवनिष्ठायात्रेनंतर शिवसंवाद यात्रा सुरू झाली. ठाणे, भिवंडी, पडघा, शहापूर आदी भागात या यात्रेला तूफान प्रतिसाद मिळाला. ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी अंत्यत नियोजन बध्द या यात्रेचे आयोजन केले होते. प्रत्येक सभेत, बंडखोरांना, गद्दार, कावळे, अशा शोलक्या भाषेत घोषणाबाजी होत होती, यावरून एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबर गेलेल्या बंडखोराविरोधात शिवसैनिकांमध्ये किती, असंतोष, संताप, राग आहे, हे जाणवत होते
शहापूर येथील तर हाँल खचाखच भरला होता, यावेळी भाषणात आदित्य ठाकरे यांनी तूम्हाला थोडी तरी लाज असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन लोकामधून निवडून येवून दाखवा असे खुले आव्हान दिले.
ही वाढती गर्दी व शिवसैनिकांचा पाठिंबा बघून शिंदे गटातील कार्यकर्त्याची धाकधूक वाढली आहे.तर भविष्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जर महाराष्ट्रात दौरा केला तर या बंडखोराचे काय होईल याचा विचार करा असे एका जेष्ठ शिवसैनिकांनी सांगितले.



No comments:
Post a Comment