कल्याण, बातमीदार : महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज सकाळी कल्याणमधील स्वानंद नगर हजेरी शेड, पारनाका हजेरी शेड, सुभाष मैदान हजेरी शेड येथे अचानक पाहणी करुन तेथील एकंदर कामकाजाचा, उपस्थित कर्मचारी वर्गाबाबतचा आढावा घेतला व अनुपस्थित आणि कामात हलगर्जी करण्या-या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश परिमंडळ-1 चे उपआयुक्त धैर्यशील जाधव यांना दिले. याच वेळी त्यांनी परिवहन गणेश घाटला भेट देवून तेथील बसेसची पाहणी देखील केली.
कल्याण पश्चिम येथील शिंदे मळा परिसर आणि सुभाष मैदान हजेरी शेडच्या आजूबाजूला असलेली अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सर्व परिसरात स्वच्छता राखणेबाबत संबंधित अधिका-यांना निर्देश दिले.


No comments:
Post a Comment