Sunday, 7 August 2022

विटावा सबवेत अंधारच अंधार विद्यार्थी व महिलांची होतेय मोठी गैरसोय !

विटावा सबवेत अंधारच अंधार विद्यार्थी व महिलांची होतेय मोठी गैरसोय !
 

*[ ठाणे - उदय गणगणे ]*

ठाणे शहरातील कळवा ठिकाणी ठाणे -बेलापूर रोड विटावा येथे रेल्वे लाईन खालील सबवेत दिवसाही अंधारातून नागरिकांना ये-जा करावी लागत असून सदर सबवेतून ये-जा करणाऱ्या महिला वर्गाला असुरक्षितता वाटत आहे. सदर सबवेच्या आसपास अनेक शाळा, हॉस्पिटल असे गर्दीचे ठिकाण असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते.साधारण दोन-तीन वर्षांपूर्वी सबवेच्या दोन्ही बाजूला विद्युत दिवे लावण्यात आले असून सदर दिव्यांचा सबवेततील आतील बाजूस मात्र परिपूर्ण प्रकाश मिळत नाही हे प्रामुख्याने लक्षात येते.शिवाय हे लावण्यात आलेले दिवे फक्त रात्रीच्या वेळेकरीता असल्याने दिवसा होत असलेल्या अंधारावरती उपाययोजनेचा अभाव दिसून येतो.


सदर सबवेच्या ठिकाणी खाजगी आणि पालिकेच्या महत्वपूर्ण शाळा असल्याने शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या पालकांना सदर सबवेत अंधार असल्याने विशेषतः महिला वर्गाला ते जास्त असुरक्षित वाटत आहे. कळवा नाका साईड कडील सबवेच्या प्रमुख दर्शीनी झाडांची झुडपे वाढली असून सदर ठिकाणी पावसाळ्यात चिखलाशीही सामना करावा लागत आहे. त्याच प्रमाणे साबवेमध्ये अनेक प्रकारच्या कॅबल्स (वायर) ताणलेल्या आहेत त्या काहीवेळा नागरिकांना गैरसोयीच्या ठरत आहेत. कोटींच्या उलाढाल असणाऱ्या महानगरपालिकेला हे फार मोठे काम नाही परंतु सदर ठिकाणी भविष्यात कोणताही अनर्थ प्रसंग घडू नये याची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. ठाणे- बेलापूर रोडवरील विटावा येथील सबवेत (रेल्वे पुलाखाली) दिवसाही विद्युत दिवे लावण्याची उपाययोजना होऊन येथील नागरिकांची समस्या दूर करण्यासाठी संबंधित महानगरपालिका अधिकारी , लोकप्रतिनिधी यांनी सदर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून या होणाऱ्या गैरसोयी पासून नागरिकांना दिलासा द्यावा अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...