Sunday, 7 August 2022

तिरुपती बालाजी ट्रस्ट (आंध्र प्रदेश) येथे अखंड भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व फोटोला मंदिरावरती बंदी ; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व एक कट्टर शिवसैनिक म्हणून आवाज उठवावा अशी मागणी :- अजित संचेती, युवा राष्ट्रीय सचिव, भारतीय राष्ट्रवादी पार्टी

तिरुपती बालाजी ट्रस्ट (आंध्र प्रदेश) येथे अखंड भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व फोटोला मंदिरावरती बंदी ; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व एक कट्टर शिवसैनिक म्हणून आवाज उठवावा अशी मागणी :- अजित संचेती, युवा राष्ट्रीय सचिव, भारतीय राष्ट्रवादी पार्टी


पुणे, बातमीदार : तिरुपती बालाजी ट्रस्ट (आंध्र प्रदेश) मध्ये अखंड भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व फोटोला मंदिरा वरती नेण्यास बंदी केली त्याबाबत आशा काही घटनांना या मागील आठवड्यात घडल्या आहेत काही आपले तिरुपती दर्शनासाठी गेले असतात त्यांच्या कार मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा काढण्यास लावली दुसरी घटना छत्रपती शिवाजी महाराजांनाच्या प्रतिमेच्या वर त्यांना त्यांच्या ट्रस्टचा पास लावण्यास सांगितले हे निंदनीय आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारतचे आराध्य दैवत आहेत.

चार ते पाच दिवसापूर्वी आपली व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत आपली सागर बंगल्यावर तिरुपती बालाजी ट्रस्ट चे अध्यक्ष यांच्या सोबत मुबई मध्ये नवीन मंदिराच्या भूमिपूजना संदर्भात मीटिंग झाली असे आपण मीडिया समोर बोलला आहात, या बाबत आपण त्यांना या गोष्टीचा जाब विचाराव व आपण एक कट्टर शिवसैनिक आहात व तुमच्या सोबत सत्तेत असलेले भारतीय जनता पार्टी यांनी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा वापर करून महाराष्ट्र मध्ये विधानसभा व लोकसभे मध्ये यश मिळवले आहेत. या बाबतीत आंध्रप्रदेश सरकारशी चर्चा करून यावर तोडगा काढावा यामुळे बाकीच्या कोणत्याच राज्यात परत हे असे होणार नाही.या साठी आपण मुंबई मधील नवीन मंदिराच्या भूमीपूजनाच्या आधी निर्णय घ्यावा, असे निवेदन भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे युवा राष्ट्रीय सचिव अजित संचेती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याना दिले आहे

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...