मुंबई, (शांताराम गुडेकर) :
गणेश भक्त कोकणवासिय प्रवासी संघ मुंबईच्या वतीने गणपती सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या गणेभक्तांचे स्नेहसंमेलन दादर पश्चिम येथील श्री छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे रवींद्र मुकानांक संघ अध्यक्ष यांच्या अध्यक्षेखाली व दीपक चव्हाण कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली थाटामाटात संपन्न झाले.
या वार्षिक स्नेह संमेलन-२०२२ कार्यक्रमाला एस.टी अधिकारी सौ.यामीनी जोशी (उपमहाव्यवस्थापक), केदार जोशी - डि.जी.एम्. प्लानींग - इंजिनीअरींग सेक्टर, शिंदे - ठाणे डेपो मॅनेजर,भडकमकर- एस टी.मध्यवर्ती कार्यालय, सौ.मानमोडे - एस टी मध्यवती कार्यालय आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष दीपक मा. चव्हाण यांनी केले. प्रस्तावना करताना संस्थेच्या माध्यमातुन प्रवासा सोबतच शैक्षणिक आणि वैद्यकिय उपक्रम राबविले जातात हेही सांगितले. प्रमुख पाहुण्या सौ. यामिनी जोशी (उपमहाव्यवस्थापक) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कोरोना नंतर एस.टी. पूर्ववत होत आहे तसेच गणपती सणाला गावी जाणाऱ्या गाड्या या सुस्थितीत देण्यात येतील असे आस्वासनही दिले.
अध्यक्ष रवींद्र मुकनाक यांनी बोलताना संस्थेचे कार्य विषिद केले. कार्यकर्त्याचे कौतुक केले. त्याच प्रमाणे कार्यक्रामाकरीता सहकार्य केलेल्या सर्वांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. प्रवासी संघाचा "उत्कृष्ट कार्यकर्ता-२०२२" म्हणून शंकर गुरव यांचा प्रमुख पाहुण्यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. संस्थेचे माजी अध्यक्ष द्विवगंत प्रमोद मोरे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी कु. धनश्री रामाने, कु. मानसी दिवेकर आणि कु. महिमा सोडये यांचाही सत्कार करण्यात आला.
स्नेहसंमेलनानिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ पार पडला. त्याच प्रमाणे मनोरंजनासाठी मालवणी भाषेतील विनोदी नाटक " वन्स मोअर तात्या " याचा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगाला संघ पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांनी चांगला प्रतिसाद दिला.
मान्यवर व गणेशभक्तांचे स्वागतासाठी विभागीय अध्यक्ष भास्कर चव्हाण, (कुर्ला विभाग ), रमेश तेजम (परळ विभाग ), श्रीधर आगरे (मुंबई सेंटर विभाग ), किशोर सावंत (बोरिवली विभाग) अजित दौंडे (नालासोपारा), गणेश फिलसे (अर्नाळा विभाग), गंगाराम खांडेकर (पंढरपूर विभाग) आपली जबाबदारी पार पाडली. स्टेज व्यवस्था अशोक नाचरे, शंकर गुरव, अनिल आगरे, शंकर नाचरे, गणेश गोरीवले, प्रशांत भेकरे, दत्ता डिगणकर यांनी उत्तमरित्या पार पाडली.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय सचिव रमेश बने, मधुकर जोईल, लक्ष्मण मंचेकर, संजय जावळे तसेच विभागीय खजिनदार , रणजित वरवटकर, शंकर घोरपडे, भागोजी सोलकर, रमेश आगरे, बाबल्या तेरवणकर यांनी विशेष मेहनत घेतली.
व्यासपीठावर पाहुण्या समवेत संस्थेचे संघटक अनिल काडगे, खजिनदार विश्वनाथ मांजरेकर हे उपस्थिती होते. पत्रकार निलेश कोकमकर, प्रभाकर खोपडे, पत्रकार कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बुदर (सरचिटणीस)यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









No comments:
Post a Comment