Saturday, 6 August 2022

संयोजकांच्या निरपेक्ष, व्यापक भूमीकेमुळे, हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृती जागर कार्यक्रमातून त्यांच्या बलिदानाची आठवण वैभववाडी तालुक्याच्या कायम स्मरणात राहणार असून सर्वांनाच त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळणार आहे.

संयोजकांच्या निरपेक्ष, व्यापक भूमीकेमुळे, हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृती जागर कार्यक्रमातून त्यांच्या बलिदानाची आठवण वैभववाडी तालुक्याच्या कायम स्मरणात राहणार असून सर्वांनाच त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळणार आहे.


वैभववाडी | तानाजीराव कांबळे
7507966260

जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना भारत मातेचे सुपुत्र,मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार रावराणे दि.7 ऑगस्ट 2018 रोजी शहीद झाले.


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सुपुत्राने आपल्या देशाचे संरक्षण करताना प्राणार्पण केले, देशासाठी बलिदान दिले,आहुती पत्करली आहे. हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या हौतात्म्याने सडूरे गावाची आणि रावराणे कुटुंबाची देशप्रेमाबद्दलची,अस्मितेची, ध्वजा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.याचा अभिमान वाटतो.


हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार रावराणे यांचा 7 ऑगस्ट 2022 रोजी चौथा स्मृतिदिन आहे.त्या निमित्त त्यांच्या मूळ गावी सडूरे तालुका वैभववाडी येथे हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे  "स्मृती जागर " 
 
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक आगळी,वेगळी आणि शिस्तबद्ध मानवंदना हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना देण्यात येणार आहे.


हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृती जागर कार्यक्रमाची संकल्पना त्यांच्या मित्र मंडळ समुहाने मांडली आणि तालुक्यातील पत्रकार मित्रांनी सामाजिक बांधिलकी माणून या संकल्पनेला प्रोत्साहीत केले. आणि अवघ्या काही दिवसांत वैभववाडी तालुक्यातील गावागावात ही संकल्पना वेगाने पोहोचली.

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृती जागर या कार्यक्रमाचे एकाच प्रकारचे बॅनर्स प्रत्येक गावच्या प्रवेशद्वारावर लागलेले आज पाहायला मिळत आहेत.तालुक्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सह.संस्था, युवक / महिला मंडळे ,विविध संघटना ही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहेत. हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृती जागर कार्यक्रमानिमित्त....  

"हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे अमर रहे"

हा सोशल मीडियाचा समुह तयार करण्यात आला असून जवळपास सुमारे 287 मान्यवर हे सर्वजण हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे स्मृती जागर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. हे खरंच अप्रुप असंच आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका गोष्टींचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल. ती म्हणजे असा कार्यक्रम आणि अशी एकजूट गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच वैभववाडी तालुक्याला पहायला मिळत आहे. देश प्रेमाची, बलिदानाची आणि शाहिद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
 
संयोजकांच्या निरपेक्ष भुमिकेमुळे, हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृती जागर कार्यक्रमातून त्यांच्या बलिदानाची आठवण, वैभववाडी तालुक्याच्या कायम स्मरणात राहणार असून या निमित्ताने त्यांच्या कार्याची सर्वांनाच प्रेरणा मिळणार आहे.

आपल्या हौतात्म्याने भारत मातेच्या इतिहासात अजरामर झालेले. भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन!
व्यर्थ न हो बलिदान !!

1 comment:

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...