Saturday, 6 August 2022

गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या म्हारळ गावातील जागेवर संविधान भवन, आरोग्य केंद्र, अंगणवाडी बांधण्याची मागणी, आमदारांची पाहणी !

गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या म्हारळ गावातील जागेवर संविधान भवन, आरोग्य केंद्र, अंगणवाडी बांधण्याची मागणी, आमदारांची पाहणी !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात एमआयडीसी पाईपलाईन च्या बाजूला आणि जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या पडिक खोल्या या चरसी, गर्दूले, गांजाडी, यासह गुन्हेगारी लोकांचा अड्डा बनल्या आहेत ,येथून येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांना, महिला, पुरुष, मुली यांना दिवसाढवळ्या लुटत असून प्रंसगी जीवघेणे हल्ले देखील झाले आहेत. त्यामुळे या खोल्या ताब्यांत घेऊन या जागेवर संविधान भवन, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी अशा समाज उपयोगी वास्तू बांधाव्यात अशी मागणी गावातील भाजपाचे मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी केली असून या दखल घेऊन आमदार कुमार आयलानी या जागेची पाहणी केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची या त्रासातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


उल्हासनगर शहराला लागून आणि म्हारळ गावाच्या हद्दीत बाँड्रीवर वनविभागाची मोठ्या प्रमाणावर जागा आहे. येथे एका संस्थेचे विद्यालय होते, परंतु ते स्थंलातरीत झाल्याने या शाळेच्या खोल्या रिकाम्या पडलेल्या आहेत, शहराला लागून व दाट झाडीत या खोल्या असल्याने आपसूकच गर्दूले, गांजाडी, चरशी, गुन्हेगारी लोकांनी येथे आश्रय घेतला, येथून उल्हासनगर, धोबीघाट, खेमानी, अंबरनाथ ला जाण्यासाठी शाँटकट असल्याने येथून अनेक महिला, पुरुष, कामगार, मुली ये जा करतात, त्यामुळे रात्री अपरात्री हे गुन्हेगार त्यांची लुटालूट करतात, चाकू, सुरा, तलवारी, गावठी कट्टा अशी जीवघेणी हत्यारे त्यांच्या कडे असतात, अगदी काही दिवसांपूर्वी शिंपी नामक तरुणांला येथे लुटले, यावेळी शेजारील महिला व पुरुष वेळेवर आल्याने त्याचा जीव वाचला होता.


या खोल्यांच्या शेजारी जिल्हा परिषदेची शाळा असल्याने शाळेतील अनेक वस्तू चोरीला गेलेल्या आहेत, पोलिसांचा कोणताही धाक नसल्याने असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे येथील शिंपी चाळ, दळवी चाळ येथील महिला, तरुण मंडळी यांनी भाजपाचे मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांना लक्ष घालण्यास सांगितले, त्यांनी आमदार कुमार आयलानी यांना यात लक्ष घालण्याची विंनती केली. त्यांनी ताबडतोब या भागाची पाहणी केली, तेव्हा येथील भयानक परिस्थिती समोर आली, या खोल्या तुटलेल्या, खिडक्या काढून नेलेल्या, गाद्या, उशा, दारुच्या बाटल्या, फुटलेले पत्रे असे विदारक चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे आमदार आयलानी यांनी ताबडतोब प्रस्ताव पाठवावा, वनविभागाशी बोलून ही जागा ताब्यात घेऊ असे आश्वासन दिलं. तर मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी सांगितले की, ग्रामसेभेत या जागेवर संविधान भवन,आरोग्य केंद्र, अंगणवाडी, महिलाबचतगटासाठी बहुउदेशीय हाँल, आदी वास्तू बांधण्याबाबतीत ठराव संमत झाले आहेत.


आमदारांच्या भेटी दरम्यान प्रविण देशमुख, महेश देशमुख, निलिमा म्हात्रे, नंदा म्हात्रे, मंगेश केणे, हरेश शिंपी, रवी मिरकुटे, राम खांडेकर, पिंटू गवाळे, बंटी जाधव, बापू बाविस्कर, योगेश सांवत, विष्णु म्हात्रे, मनिष व-हाडे, आदी मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...