Tuesday, 2 August 2022

आदिवासींना पावसाळ्यात खावटी द्यावी आमदार सुनिल भुसारा यांची मागणी !!

आदिवासींना पावसाळ्यात खावटी द्यावी आमदार सुनिल भुसारा यांची मागणी !!


जव्हार- जितेंद्र मोरघा :

           राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विविध समस्यां घेवून मुंबई येथे राज्यपालांची भेट घेतली या राज्यातील विविध मुद्यांबरोबरच गोर गरीब आदिवासी बांधवांना नवीन पिके हातात येत नाहीत तो पर्यंत या पावसाळ्यात तातडीने खावटी योजनेद्वारे अन्नधान्याचे वाटप करावे हा मुद्दा पवार यांनी मांडला मुळात राज्यपालांकडे जाण्याच्या अगोदर याबाबत राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेतेमंडळी मध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनीच हा खावटीचा मुद्दा घ्यावा अशी विनंती केल्यानंतर हा मुद्दा निवेदनात घेण्यात आला आणि त्याबद्दल मिडीयालाही पवार यांनी याबाबत सांगितले यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासींची जाण असलेले आमदार भुसारा हे आज दिवसभर पत्रकार परीषदेत, राज्यपाल महोद्यांची भेट या सगळ्या घडामोडीत झळकताना दिसले. 
               पावसाळा सुरू झाल्यानंतर या चार महिने आदिवासी बांधवांना अन्न धान्य डाळ तेल याची गरज असते मुळात शेतीतच काम करत असल्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी कामहि करणे शक्य नसल्याने घरात आर्थिक अडचण असते अशावेळी शासनाकडून खावटी योजना तात्काळ चालु करून याचे वाटप करावे अशी मागणी शासनाला करावी अशी विनंती काल (२) रोजी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याकडे भुसारा यांनी केली होती याची तात्काळ दखल घेत पवार यांनी राज्यपालांना राज्यातील विविध मागण्यांचे जे निवेदन दिले त्यामध्ये या मागणीचाही उल्लेख केला आहे.
भुसारा यांच्या या मागणीचे आदिवासी बांधवांकडुन स्वागत होत असून आता राज्यसरकारने याबाबतच निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी होत आहे.
              पवार यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परीषदे मध्ये राज्यपालांना विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे जाहिर केल्यानंतर भुसारा यांनी आदिवासी बांधवांच्या या अडचणी बाबत चर्चा करून निवेदनात तो विषय घेण्यात आला यावेळी भुसारा हे राज्यपालांचा भेटीलाही गेले यावेळी या मागणीबाबत सकारात्मकता दाखवत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना याबाबत कळवले जाईल असे राज्यपाल बोलल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !!

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !! ** Gail & Bharat (2025) दिग्दर...