Tuesday, 2 August 2022

ज्येष्ठ समाजसेविका कै. शांताबाई अर्जुन बुवा चौधरी यांची शोक सभा भावपूर्ण वातावरणात संपन्न !

ज्येष्ठ समाजसेविका कै. शांताबाई अर्जुन बुवा चौधरी यांची शोक सभा भावपूर्ण वातावरणात संपन्न !


डोंबिवली, बातमीदार : आगरी समाजातील ज्येष्ठ नेते विचारवंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी अर्जुन बुवा चौधरी यांच्या धर्मपत्नी कै. शांताबाई अर्जुन बुवा चौधरी यांचे 24 जुलै 2022 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ जाहीर अभिवादन शोकसभेचे आयोजन शांती सागर बंगला निवास काटई गाव येथे करण्यात आले होते. सदर जाहीर अभिवादन सभेस माजी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, अंबरनाथ नगर परिषदेचे माजी अध्यक्ष गुलाबराव करजूळे, पुरुषोत्तम उगले महाराज, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती वंडर शेठ पाटील, गुलाब वझे, कृष्णाबुवा मडवी, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, गोवर्धन भगत, शांताराम भोईर, जे. एम. म्हात्रे, माजी नगरसेवक सुरेश जोशी, दीपक शेठ ठाकूर, चंद्रकांत पाटील, भगवान पांडुरंग पाटील, लक्ष्मण पाटील, रामचंद्र पाटील, गजानन मंगरूळकर, शरद पाटील, तकदीर काळन, महेंद्र धर्मा पाटील, सुभाष आनंद पाटील, बैजनाथ देसले, संतोष पाटील, जगन्नाथ बुवा चौधरी, गणेश महाराज, विनीत महाराज, रवी थोरवे, आकाश देसले, कैलास पाटील उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ समाजसेविका कै. शांताबाई अर्जुन बुवा चौधरी यांच्या एकंदरीत जीवन प्रवासाच्या सामाजिक कार्याप्राती उपस्थित विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अत्यंत शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली सभा संपन्न झाली.
या प्रसंगी अर्जुन बुवा काथोड चौधरी, संतोष अर्जुन चौधरी, निता संतोष चौधरी, अजिंक्य अर्जुन चौधरी, आविष्या अजिंक्य चौधरी, विजय अर्जुन चौधरी, मृणाली विजय चौधरी, ज्योती जयेंद्र पाटील, प्रगती अमित म्हात्रे यांचे ज्येष्ठ समाजसेविका कै. शांताबाई अर्जुनबुवा चौधरी यांच्या दुःखद निधनाच्या प्रती उपस्थित राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी सांत्वन केले.

No comments:

Post a Comment

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!! कल्याण प्र...