महानगर सफाई कर्मचारी संघाच्या वतीने "मा. मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब" यांची घेतली सदिच्छा भेट !
ठाणे, प्रतिनिधी : महानगर सफाई कर्मचारी संघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना, एकनाथजी शिंदे साहेब यांची महानगर सफाई कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -- भारत गायकवाड , महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष -- महेश गायकवाड , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष -- नवीन गवळी, रामचंद्र तायडे ,महाराष्ट्र राज्य सल्लागार -- मधुकर वाल्हेकर, कडोंमपा युनिट सल्लागार -- बाळकृष्ण कदम यांनी सदिच्छा भेट घेतली व मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अभिनंदन केले.
यावेळी महानगर सफाई कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -- भारत गायकवाड , महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष -- महेश गायकवाड , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष -- नवीन गवळी यांनी मा. मुख्यमंत्र्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील समस्यांविषयी अवगत केले व निवेदन दिले. निवेदनात प्रामुख्याने १) सर्व सफाई कामगार व इतर कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतन मिळणे २) कंञाटी कामगारांना मनपा मार्फत थेट वेतन व इतर सुविधा मिळणे ३) सुरक्षित जीवन म्हणून कामगारांना मेडिक्लेम व आरोग्य सुविधा मिळणे ४) कडोंमपातील २७ गावातील कर्मचाऱ्यांना महानगर पालिकेत सामावून घेऊन मनपा प्रमाणे सुविधा व वेतन मिळणे ५) सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करणे या मागण्या आहेत.
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी याबाबत आश्वासीत करून या विषयावर योग्य तो निर्णय लवकरच घेऊ तसेच सत्तावीस गावातील सर्व कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येईल असे सांगितले. महानगर सफाई कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भरत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी महानगर सफाई कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -- भारत गायकवाड , महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष -- महेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष -- नवीन गवळी, रामचंद्र तायडे, महाराष्ट्र राज्य सल्लागार -- मधुकर वाल्हेकर, कडोंमपा युनिट सल्लागार -- बाळकृष्ण कदम, कडोंमपा २७ गावातील समाजसेवक -- सुभाष अनंता पाटील, तसेच वरीष्ठ नेते नाना चिकणकर, विजय भंडारी, जनार्दन जाधव, केतव गायकर, प्रसाद पाटील, श्रीकांत पाटील, विकास ठाकूर, टिकाराम देसले, गणेश थोरात, प्रभाकर पाटील, साईनाथ म्हात्रे तसेच इतर बहुसंख्य कर्मचारी व महीला कर्मचारी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment