जव्हार- जितेंद्र मोरघा :
जव्हार तालुक्यातील आदिवासी प्रतिष्ठान संस्था ही ग्रामिण भागात गरजु मुलांना दरवर्षी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करते, आज आदिवासी प्रतिष्ठान संस्थेकडून जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सुर्यानगर (सुर्यानगर) आणि जिल्हा परिषद शाळा पिंपळकडा या दोन्ही शाळेवर मुलांना वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, पाट्या, अंकलिपी असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, या दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटप करण्यात आले. यावे संस्थेचे अध्यक्ष गणेश जंगली, उपाध्यक्ष परशुराम गोंड, सचिव रमेश खुताडे, सदस्य भारत कामडी, सुरेश नडगे, रघु गावित, पत्रकार जितेंद्र मोरघा, शाळेतील मुख्खाध्यापक नडगे सर, दिघा सर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment