कल्याण, बातमीदार : समाजसुधारक, लोककवी, लेखक, शाहीर अशी अनेक बिरुदे मिरवणारे अण्णा भाऊ साठे म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे यांची जयंती अखिल भारतीय मातंग संघ कल्याण शहर शाखेच्यावतीने कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथे भव्य दिव्य जयंती साजरी करण्यात आली.
सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहिरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही, मात्र अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या तिशीलतेवर आधारलेले होते. अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील नागरिकांनी उपस्थिती लावली. वाजत गाजत डीजे च्या तालावर शिवशाहीर अण्णा साठे यांचा विजय असो असे म्हणत जल्लोष करण्यात आला.
यावेळी लाल चौकी येथील अण्णाभाऊ साठे नगर मधील रहिवाश्यांनी लालचौकी येथील जागा जयांतीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष चक्रधर घुले, रवी गवळी, मोहन गवळी, गुलाब जगताप, रतन चव्हाण, आकाश घुले, संजू फुले, संतोष नाडे समस्त अण्णाभाऊ साठे नगर रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment