Tuesday, 2 August 2022

डोंबिवली शहरात अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

डोंबिवली शहरात अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी !


डोंबिवली, बातमीदार : समाजसुधारक, लोककवी, लेखक, शाहीर अशी अनेक बिरुदे मिरवणारे अण्णा भाऊ साठे म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे यांची जयंती डोंबिवली पूर्व इंदिरा चौक भारतीय जनता पार्टी साई शिवाजी शेलार यांच्या कार्यालयाजवळ  भव्य दिव्य जयंती साजरी करण्यात आली.      
सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहिरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही, मात्र अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या आधारलेले होते. अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी डोंबिवलीच्या नागरिकांनी उपस्थिती लावली. तसेच यावेळी भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक मंदार टावरे, मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, समाज सेवक राजू भाई शेख, महिला ग्रामीण अध्यक्ष मनीषा राणे मॅडम, रवी ठाकूर, वार्ड अध्यक्ष सुशीला ताई गवई, महिला मोर्चा अध्यक्ष पूनम ताई पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष मीतेश पेनकर, चंद्रकांत पगारे तसेच यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येमध्ये नागरिक व महिला उपस्थित होते.
यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे राजू भाई शेख यांच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक डोंबिवलीमध्ये व्हावे अशी भावना देखील व्यक्त केली.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे – आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २६/२०२५चा समारोप उत्साहात संपन्न !!

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे – आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २६/२०२५चा समारोप उत्साहात संपन्न !! ठाणे :...