Friday, 5 August 2022

*** विविध उपक्रमांनी देवगाव शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा*** ** प्रशासकीय यंत्रणेतील,पोलिसांतील माणूस,या विषयावर, पो.नि. प्रसाद पांढरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन **

*** विविध उपक्रमांनी देवगाव शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा***
** प्रशासकीय यंत्रणेतील,पोलिसांतील माणूस,या विषयावर, पो.नि. प्रसाद पांढरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन **


मुरबाड  :- ( मंगल डोंगरे ) :
जि.प. प्राथमिक केंद्रशाळा देवगाव  येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विध्यार्थ्यांना प्रशासकीय यंत्रणेतील पोलिसांतील माणूस ह्या विशेष कार्यक्रमात मुरबाड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद पांढरे साहेब यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले. 


विध्यार्थानी पोलीस दलात जावून देशाची सेवा करावी व आईवडिल गुरुजनांचा सन्मान कसा राखावा याचे महत्वपूर्ण  मार्गदर्शन केले ..त्यांनी यावेळी  विद्यार्थी व शाळेचे कौतूक केले. तत्पूर्वी  सैन्य दलात असलेल्या अनिकेत अढाईगे यांचाही सत्कार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  झाले.तसेच सैन्य दलातील सेवानिवृत्त श्री. जयवंत तुपे यांच्या हस्ते ध्वजारोहन ही करण्यात आले आहे. 


अमृत महोत्सवानिमित्त स्पर्धा व उपक्रमात पालक विद्यार्थी नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे. त्यातून आज घोषवाक्य स्पर्धा व राष्ट्रध्वज रंगभरण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्याच्या उत्फुर्त प्रतिसादाने स्पर्धा पार पडली. विध्यार्थ्यां बरोबरच पालकांनीही सहकार्य केले. अनेक विद्यार्थांनी स्पर्धेत विजय मिळविला. शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम सदर शाळेत वारंवार राबविले जात असतात. त्यामुळे चारही बाजुला इंग्रजी माध्यमाच्या शाळा असुनही गेल्या तीन वर्षात शाळेचा पट १५९ वरून २३२ पर्यंत गेला आहे. इयता १ ली ते ७ वी पर्यंतचे सर्व वर्ग सेमी इंग्रजीचे आहेत. तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मान्यवरांचे मार्गदर्शन व मदतही मिळवून दिली जात आहे. पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद पांढरे साहेब यांच्या हस्ते मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले. आज झालेल्या कार्यक्रमांसाठी पोलिस निरिक्षक श्री. प्रसाद पांढरे साहेब 'तसेच त्यांच्या समवेत गुप्तचर विभागाचे  श्री. विनायक खेडकर साहेब, देवगावच्या सरपंच सौ. अंजना भांडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सविता तुपे, पोलीस पाटील गणेश तुपे, सामाजिक कार्यकर्ते विकास भांडे 'सीटू कामगार संघटनेचे दिलीप कराळे व पालक उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व्यवस्थापन मुख्याध्यापक एकनाथ देसले सर तर सुत्रसंचलन नितीन घागस सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक डॉ. निलकंठ व्यापारी सर, श्रीमती नंदिनी सरनोबत मॅडम' सौ. पौर्णिमा भोईर मॅडम, श्रीमती प्रतिमा नागरगोजे मॅडम यांनी केले. डॉ. निलकंठ व्यापारी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...