Wednesday, 3 August 2022

राजधानीत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी !

राजधानीत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी !


नवी दिल्ली दि. ३ : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.   


              कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा आयुक्त (गुंतवणूक व राजशिष्टाचार) आणि निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निधी  पांडे  यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  
                    
                    महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन   

               महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली  वाहिली.   

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...