Tuesday, 2 August 2022

आगरी सेनेचा योग्य सन्मान राखा अन्यथा महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवू ; "आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी" यांनी पुकारला एल्गार !

आगरी सेनेचा योग्य सन्मान राखा अन्यथा महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवू ; "आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी" यांनी पुकारला एल्गार !


ठाणे, बातमीदार : आगरी समाजाचा योग्य पद्धतीने मान राखला न गेल्यास आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आगरी सेना स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाईल असा इशारा आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी यांनी दिला आहे.


आगरी समाजासाठी गेले ३६ वर्ष लढा उभारणाऱ्या आगरी सेनेचा ३६ वा वर्धापन दिवस काल गडकरी रंगायतन येथे अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळेस आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी हे बोलत होते.


या दिवशी आगरी सेनेच्या वेबसाईटचा प्रकाशन समारंभ देखील संपन्न झाला. आगरी सेना सातत्याने ३६ वर्ष भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. आगरी सेना कोकणातील जिल्हा जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात जिथे आगरी बांधव आहेत तिथे तिथे पोहोचली आहे. भविष्य काळामध्ये संघटनेमध्ये अधिकाधिक आक्रमकता आणून संघटनेच्या अधिकाधिक शाखा उभारण्याचा मानस या वेळेस आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी आणि आगरी युवासेना प्रमुख श्री राहुल साळवी यांनी व्यक्त केला.
आगरी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एका रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आगरी युवक सहभागी झाले होते. आगरी सेना ही अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारी संघटना आहे .या संघटनेच्या माध्यमातून कोकणातील जिल्हा जिल्ह्यांमध्ये आगरी सेनेने विविध प्रकारचे लढे उभारण्यात आले. विशेषतः मिठाचा प्रश्न, आगरी बांधवांच्या जमिनीचा प्रश्न, किंवा आगरी बांधवांमधले आपापसातले तंटे सोडवण्याचा महत्त्वपूर्ण कार्य आगरी सेनेच्या माध्यमातून झाले असल्याचं यावेळेस आगरी सेनाप्रमुख श्री राजाराम साळवी यांनी सांगितलं. सध्याच्या काळात तर आगरी सेनेचे आकर्षण आगरी बांधवांमध्ये अधिकाधिक वाढत आहे. आगरी सेनेचा राजकारणावर मोठ्या प्रमाणात अंकुश आहे राजकारण्यांना सरळ करण्याचं काम भविष्यात देखील करणार असल्याचं यावेळेस श्री राजाराम साळवी यांनी स्पष्ट केलं. आगरी सेनेचा योग्य सन्मान राखा अन्यथा येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका संदर्भात आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देखील या वेळेस श्री राजाराम साळवी यांनी दिला. यावेळी बोलताना श्री राहुल साळवी यांनी ग्रास रूट लेवलला यापुढे जाऊन काम केलं जाणार आहे.
गावागावामध्ये आगरी सेनेच्या शाखा उघडल्या जाणार आहेत, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांचा लढा अधिक तीव्र केला जाईल असे देखील या वेळेस श्री राहुल साळवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
सत्तेसाठी नाही तर आगरी सेनेने सातत्याने समाजासाठी संघर्ष केला आहे हा संघर्ष भविष्यकाळात देखील सुरू राहील असं यावेळेस श्री संजय फुलोरे यांनी सांगितले. आगरी सेनेच्या वर्धापन दिनाच औचित्य साधून अंबरनाथ मधील गावांचं गावठाण हा विषय तडीस नेण्यात येईल.
कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर, श्री प्रदीप साळवी, युवा आग्री सेनाप्रमुख राहुल साळवी, आगरी सेनेचे कार्याध्यक्ष चंदुलाल घरत, उपाध्यक्ष गणपत कडू, सरचिटणीस ऍड. मेघनाथ पाटील, उपाध्यक्ष कैलास पाटील, खजिनदार प्रकाश नरसाणा, संपर्कप्रमुख मनोज साळवी, महिला अध्यक्ष मनीषा पाटील, कामगार एकताचे सरचिटणीस भालचंद्र साळवी, कामगार एकताचे चिटणीस सुमित पाटील, उपाध्यक्ष किसन भांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...