Tuesday, 2 August 2022

चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने खासदार राहुल शेवाळे यांची घेतली भेट ! 'समाजाच्या विविध मांगण्यावर केली सकारात्मक चर्चा'

चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने खासदार राहुल शेवाळे यांची घेतली भेट  !

'समाजाच्या विविध मांगण्यावर केली सकारात्मक चर्चा'


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघाच्या मार्गदर्शिका माजी नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभाचे खासदार राहुल शेवाळे यांची सदिच्छा भेट घेवुन चर्मकार समाजाच्या मागण्या विषयी सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी मुंबईच्या देवनार येथील लिडकॉमच्या जागेमध्ये संत रविदास महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे, तसेच चर्मकार विकास केंद्र करण्यात यावे, मुंबईत गटई कामगारांना पीच परवाना द्यावा, स्वयं रोजगारासाठी जाचक अटी रद्द करुन विनातारण, विना जामीनदार कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या दरम्यान संघाच्या सर्व मागण्याचा विचार करून शासन स्तरावर पाठपुराव्यातून समाजाला न्याय मिळवून देणार असे आश्वासन खासदार राहुल शेवाळे यांनी याप्रसंगी दिले. चर्मकार विकास संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे - निंमगावकर यांच्यासह या शिष्टमंडळात राजेश साबळे (सहसचिव महाराष्ट्र), अशोक कांबळे (गटई कामगार अध्यक्ष), हंसराज रेगर (रेगर समाज अध्यक्ष), चेतना कोरगावकर, मीनाक्षी ताई सोनावणे ( जिल्हाध्यकक्षा उत्तर पश्चिम), प्रकाश चिमणकर (घाटकोपर तालुकाध्यक्ष), राजेंद्र ठोसर (तालुका सचिव), राहुल कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह चर्मकार विकास संघाचे अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...