Monday, 1 August 2022

आजीबाईंच्या शाळेत हर घर तिरंगा मोहीम !!

आजीबाईंच्या शाळेत हर घर तिरंगा मोहीम !!


मुरबाड, { मंगल डोंगरे } : जगप्रसिद्ध लिम्का बुक रेकॉर्ड प्राप्त, कौन बनेगा करोडपती शो मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी गौरव केलेली आजीबाई शाळा फांगणे येथे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा या राज्य शासनाच्या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी राख्यांची निर्मिती केली आहे. आजीबाई शाळा ही जगातील पहिली व एकमेव शाळा आहे. कि, ती ६० ते ९४ वयाच्या ३० आजीबाई आपल्या उतार वयात शिक्षणाचे धडे गिरवत असलेली शाळा आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते. ह्या वाक्याला सत्यात आणण्याचे काम या आजीबाईनी जिद्द कष्ट, त्याग याद्वारे अधोरेखित केले आहे. आतापर्यंत देशविदेशातील अनेक मान्यवर, पत्रकार यांनी या उपक्रमाला प्रत्यक्षात भेट दिली असून अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, अशा देशातील २० हून अधिक परदेशी पाहुणे या शाळेत येऊन गेले आहेत.


       कैलासवासी मोतीराम गणपत दलाल ग्रुप संचलित आजीबाई शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून हर घर तिरंगा हा संदेश राख्यां द्वारे सर्वदूर पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभक्तीपर अशा या उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा अशी आजीबाईंची भावना आहे. ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी आजीबाईंचे कौतुक केले असून तसा संदेश पाठवला आहे. या उपक्रमासाठी दिलीप दलाल, योगेंद्र बांगर, शितल मोरे यांनी मेहनत घेतली आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...