मुरबाड :- { मंगल डोंगरे } : मुरबाड तालुक्यातील शिक्षण विभागाचे सुमारे २९ केंद्रातील केंद्र प्रमुखांची गेल्या दोन वर्षांपासून तालुक्या बाहेर बदली तसेच सेवा निवृत्त झाले असले तरी त्यांनी त्या केंद्राचा पदभार हा दुसऱ्या केंद्र प्रमुखांना सुपुर्द न केल्यामुळे त्या केंद्रांचे कार्यक्षेत्रातील शाळांचा कारभार बघायचा कसा हा संतप्त सवाल केंद्र प्रमुख शिक्षण विभागाला करत आहेत.** शिक्षण खात्याचा सावळा गोंधळ**
ठाणे जिल्हा परिषदेने २०२० मध्ये विभागाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसह केंद्र प्रमुखांच्या तालुका स्तरावर बदल्या केल्या या बदल्या मध्ये मुरबाड तालुक्यातील सुमारे सात ते आठ केंद्र प्रमुखांच्या देखील बदल्या करण्यात आल्या.त्यावेळी काही केंद्र प्रमुख हे सेवा निवृत्त झाले .मात्र या केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्राचा पदभार हा दुसऱ्या केंद्र प्रमुखांना न देता तेथुन पळ काढला आहे. शासनाने सन २०१० मध्ये शिक्षकांचा पगार हा केंद्र प्रमुखा मार्फत करण्याचे आदेश जारी केले होते. त्यावेळी केंद्रात असणाऱ्या शिक्षकांचा पगार हा केंद्र शाळेचे खात्यावर जमा होत होता. अशा प्रमाणे दोन वर्षे केंद्र प्रमुख हे शिक्षकांना पगार देत असताना प्रत्येक केंद्र शाळेचे खात्यावर सुमारे तीन ते चार लाख रुपये शिल्लक असल्याचे समजते. परंतु ज्या केंद्र प्रमुखांनी गेल्या दोन वर्षांपासून पदभार दिलेला नाही.त्यांनी शासनाचे रकमेचा अपहार केल्याची शक्यता नाकारता येत नाहीच शिवाय ते दोन ठिकाणी आपले वेतन घेत असल्याची चर्चा शिक्षण विभागात होत असताना दप्तराचे अभावी या शाळांचे कामकाज करावे कसे या विवंचनेत कार्यरत केंद्र प्रमुख सापडले आहेत.
!! शिक्षण विभागात जर अशी समस्या असेल तर त्या केंद्र शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन दप्तराची पाणी करून त्या केंद्र प्रमुखावर कारवाई करण्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदे कडे सादर करावा- श्वेता पालवे.गट विकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड.


No comments:
Post a Comment