मुंबई (शांताराम गुडेकर /दिपक फणसळकर) :
भाजपा माजी उपनगराध्यक्ष मुचकंदी परिसर विकास संघ ग्रामीण कमिटी उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुचकंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. रक्तदात्यानी भरघोस प्रतिसाद दिला. ५० रक्तदात्यानी रक्तदान केले. जि.प.प्राथमिक शाळा धुंदरे येथे हा कार्यक्रम पार पडला. कांबळे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले कुणबी समाजाचे नेते परवडी, भाजपचे तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर, नगरपंचायत गटनेते संजय यादव, नगरसेवक मंगेश लांजेकर, दादा भिडे, वसंत घडशी, कोळवंकर गुरुजी, सह्याद्री कुणबी संघ महाराष्ट्र प्रांत कार्याध्यक्ष गणपतदादा घडशी, कुर्णे गावावचे माजी सरपंच रघुनाथ घडशी, रणदिवे दादा, सीताराम पालकर, गुरुप्रसाद देसाई,नगरसेविका पूर्वा भाईशेट्ये, प्रसाद भाईशेट्ये, मंगेश बापरेकर, पप्पू मूळे, विलवडे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष तुषार पालकर व सर्व सभासद चालक मालक प्रवाशी वाहतूक, संयमी मित्रमंडळ विलवडे अध्यक्ष उदय पळसुले देसाई, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर ग्रामीण प्रमुख (उपाध्यक्ष) गणेश खानविलकर आणि सर्व पदाधिकारी रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान हेच जीवनदान.. असा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment