Thursday, 4 August 2022

मुरबाड मध्ये विविध उपक्रमांनी आगरी सेनेचा 36 वा वर्धापन दिन सोहळा साजरा !!

मुरबाड मध्ये विविध उपक्रमांनी आगरी सेनेचा 36 वा वर्धापन दिन सोहळा साजरा !!    


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : १ आँगस्ट हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आगरीसेनेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून दिनांक १ आँगस्ट रोजी मुरबाड मध्ये विविध उपक्रम साजरे करून आगरी सेनेचा ३६ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


              यावेळी क्रांतीवीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या स्मारकात मान्यवरांच्या हस्त हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, आगरीसेनेचा ध्वज उभारुन त्याला मानवंदना देण्यात आली. तसेच स्मारक परिसरात व्रुक्षारोपन करण्यात आले. त्यानंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मोठ्या जयघोषाने अभिवादन करण्यात आले. 


        पुढे संपूर्ण मुरबाड शहरभर बाईक रँली काढण्यात आली. सदर कार्यक्रम नवनिर्वाचित मुरबाड तालुका अध्यक्ष महेश भगत, उपजिल्हाध्यक्ष पांडुरंग शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 


       याप्रसंगी मुरबाड पं.स. माजी उपसभापती, श्री. दिपक खाटेघरे, मुरबाड नगरपंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, श्री रामभाऊ दुधाळे, मा. उपनगराध्यक्ष, श्री नारायण गोंधळी, ठाणे जि.प. निमंत्रीत सदस्य, श्री भगवान भगत सर, नगरसेविका सौ. उर्मिला ठाकरे, सौ. दिक्षिता वारघडे, सौ. अनिता- दु्धाळे-मार्के, सौ.रविना राव, सौ.नम्रता जाधव, नगरसेवक श्री.मोहनजी गडगे, श्री. महेंद्र पवार सर, मा. ग्रा.पं. सदस्य श्री गणेश वारघडे, ग्रा.पं. खांदारे - जामघर मा.सरपंच श्री अशोक भगत, मुरबाड पोलिस स्टेशन चे गुप्तचर विभागाचे श्री. विनायक खेडकर साहेब, श्री. दिलीप शेळके, ग्रा.पं. डोंगरन्हावे सरपंच, श्री. विलास शेळके, श्री. शशिकांत जामघरे, एकनाथ खाटेघरे, नितेश खारिक, योगेश हुमणे, भुषण भोईर आदींसह मुरबाड मधील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
          सदर कार्यक्रमासाठी आगरी सेना मुरबाडचे प्रमुख पदाधिकारी श्री पांडूरंग शेळके, श्री महेश भगत, श्री. राकेश भुंडेरे, श्री तानाजी लिहे, श्री निलेश खाटेघरे, श्री दयेश भगत, श्री. सुरेश गोंधळी, श्री पांडूरंग गडगे, श्री मधुकर भांडे, श्री. मुकुंद कराळे, श्री. शिवाजी वारघडे, श्री भास्कर भोईर, श्री. दिनेश दळवी, चंद्रकांत राणे, आशिष खाटेघरे, उमेश धुमाळ, विशाल भगत, दिनेश भांडे यांसह आगरी सेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले व पुढे मुरबाड मधील कार्यक्रम आटोपल्यावर संपूर्ण ताफा ठाणे येथील गडकरी रंगायतन मधील मुख्य कार्यक्रमास रवाना झाले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...