Sunday, 7 August 2022

ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार किसन कथोरे यांनी दिली उत्तरे, विविध योजनाची दिली माहिती !

ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार किसन कथोरे यांनी दिली उत्तरे, विविध योजनाची दिली माहिती !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या महा आवास घरकुल पुरस्कार वितरण कार्यक्रमात तालुक्यातून आलेल्या विविध ग्रामस्थांनी अनेक प्रश्न, अडचणी, समस्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसन कथोरे यांच्या समोर मांडल्या यावेळी आमदार महोदयांनी तितक्याच दिलखुलासपणे याची उत्तरे देऊन विविध योजनांची, निधीची माहिती उपस्थिती नागरिकांना दिली.


कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात मुरबाड विधानसभेत आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिंरगा, अभिमान पुर्व तयारी, मार्गदर्शन व महा आवास अभियान ग्रामीण २:० मधील उत्कृष्ठ काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविक व आमदार महोदयांचे मार्गदर्शन झाल्यानंतर कोणाचे काही, प्रश्न, अडचणी, समस्या असतील तर त्या विचाराव्यात असे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी सूचविले, यानंतर लगेचच मानिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत गायकर यांनी आदिवासी, कातकरी समाजाच्या घरासाठी जागेची अडचण, गुरचरण, वन जमीन आदी विषयी प्रश्न उपस्थित केला, पाणी पुरवठा व गावठाण विस्तार बाबतीत समस्या मांडली.


यावर आमदार किसन कथोरे यांनी आदिवासी व कातकरी समाजाच्या घराचे गुरचरण, जागेचा प्रश्न येणार नाही, प्रस्ताव पाठवा मी मंजूर करून घेतो, असे सांगून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना मंजूर करण्यात येईल, रायता पाणी पुरवठा योजनेसाठी २५ कोटींचा निधी दिला असून तालुक्यातील बहुतेक रस्ते हे जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र शासनाकडे घेतले असल्याचे सांगून  यासाठी सुमारे १२५ कोटींच्या आसपास निधीची तरतूद करण्यात आलीय असे सांगितले, तर गावठाण विस्ताराबाबतीत बोलताना ते म्हणाले, ज्या गावाना ही अडचण आहे, त्यांनी गावठाण विस्ताराचे प्रस्ताव सादर करावे मी ते मंजुरीसाठी प्रयत्न करतो, तसेच कल्याण पंचायत समितीच्या नवीन इमारती विषयावर बोलताना ते म्हणाले, हा विषय ब-याच वर्षांपासून प्रंलबित आहे, तहसील व पंचायत समिती एकाच इमारती करण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे, लवकर तो प्रश्न मार्गी लावू असेही ते म्हणाले,

यानंतर पंचायत समिती सदस्य यशवंत दळवी यांनी देखील घरकुलापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला. याला देखील आमदार कथोरे यांनी समाधानकारक उत्तर दिले. त्यामुळे आजच्या उपसरपंच चंद्रकांत गायकर यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे अनेक योजनांची, निधीची माहिती उपस्थित नागरिकांना मिळाली, यावेळी मानिवली च्या सरपंच माया गायकर, ग्रामसेविका स्वाती शेलार, सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर आदी तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...