Sunday, 7 August 2022

संत ज्ञानेश्वर चौक येथे आम आदमी पार्टी डोंबिवली यांनी जीएसटीत भरमसाठ वाढ केल्याने केली लोकांमधे जनजागृती, नोंदविला केंद्र सरकारचा निषेध !

संत ज्ञानेश्वर चौक येथे आम आदमी पार्टी डोंबिवली यांनी जीएसटीत भरमसाठ वाढ केल्याने केली लोकांमधे जनजागृती, नोंदविला केंद्र सरकारचा निषेध !


डोंबिवली, : देशातील बड्या उद्योगपतींची हजारो-लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ केली जात असताना गोरगरीब जनतेला मात्र जीएसटी रूपी लूटनारा कर लावून उपासमारीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. दुसरीकडे शासकीय सवलती, सुविधा काढून घेण्याचे पाप मायबाप सरकार-शासन करीत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. अन्नधान्य, शालोपयोगी व इतर जिवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कर काढून टाकून जनतेला दिलासा देण्यात यावा यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने डोंबिवली ह प्रभाग वार्ड, संत ज्ञानेश्वर चौक येथे जनजागृती करण्यात आले.


केंद्र शासनाने जीएसटीमध्ये बदल करून अन्नधान्य, रुग्णालयीन आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीत भरमसाठ वाढ केल्याने गरीब जनतेचा हाल झाला आहे ह्या मुद्द्यावर लोकांना जनजागृती केले आणि केंद्र सरकारचा निषेध दर्शविला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...